India Languages, asked by mohitbohra8160, 1 year ago

Essay on shetkari nasta tar in Marathi

Answers

Answered by Sammy1111
16
There would be food and without that people can't live
Answered by halamadrid
16

■■ शेतकरी नसता तर!!■■

शेतकरी आपला "अन्नदाता" आहे आणि त्याचे योगदान आपल्या समाज व देशासाठी सगळ्यात महत्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे आपल्याला खायला अन्न मिळते.अशा वेळी, शेतकरी नसता तर, हा विचारच मनात खूप भीती निर्माण करतो.

शेतकरी नसता तर,लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल.शेती करणे जितके सोपे दिसत असते,वास्तवात ते इतके सोपे नसते.

शेतकरी नसल्यावर आपल्याला शेतात दिवस रात्र काम करावे लागेल,तेव्हा जाऊन आपल्याला खायला अन्न मिळेल.तेव्हा तरी आपल्याला अन्नाचे महत्व कळेल.

शेतकरी नसता तर,आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर फार वाईट परिणाम होईल कारण बर्‍याच कृषी उत्पादनांची निर्यात बाहेरच्या देशांमध्ये केली जाते.

शेतकरी केवळ खाता येईल अशी पिके पिकवत नाही,तर तो विविध उद्योगांमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी वापले जाणारे पिके तयार करतो.काही पिकांचा उपयोग जनावरांना अन्न म्हणून वापरले जाते.शेतकरी नसता तर, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पीके कुठून मिळणार?

शेतकऱ्याचे काम खूप मेहनतीचे व कठीण असते.अशा वेळी,शेतकरी नसता तर हा विचारसुद्धा खूप भयंकर आहे.

Similar questions