ESSAY ON SHIKSHANACHE MAHATVA IN MARATHI
Answers
Answer:
शिक्षणाचे प्रत्येकाच्या जीवनात महत्वाचे स्थान असते.एका अज्ञानी माणसापेक्षा एका शिक्षित माणसाला समाजात जास्त आदर मिळतो.
शिक्षणामुळे आपल्याला विविध गोष्टींची माहिती मिळते. आपल्या इतिहासबद्दल माहिती मिळते, पौराणिक कथांबद्दल ज्ञान मिळते,पर्यवरणाच्या विविध घटकांबद्दल माहिती मिळते,जगाबद्दल ज्ञान मिळते.
शिक्षण आपल्याला पुस्तकी ज्ञान देत असतोच,पण सोबतच आपल्याला एक चांगला माणूस बनवतो.शिक्षणामुळे आपली विचारसरणी सुधारते,शिक्षण जीवनातील अडचणींचा सामना करायला शिकवतो.शिक्षण आपल्याला सामाजात वावरायला शिकवतो,चांगली मानवी मूल्ये शिकवतो.
चांगले शिक्षण मिळवल्यावरच आपण पुढे जाऊन जीवनात यशस्वी बनू शकतो.आपण पैशाने बऱ्याच गोष्टी विकत घेऊ शकतो,पण ज्ञान विकत घेता येत नाही.त्यासाठी आपल्याला शिकावे लागते.
तेव्हा आपण प्रत्येकाने शिक्षण घेतलेच पाहिजे आणि इतरांसुद्धा शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले पाहिजे.
Explanation: