India Languages, asked by pattemsathwiks7860, 9 months ago

Essay on Shravan month festivals in Marathi

Answers

Answered by Anonymous
0

Explanation:

मध्येच ऊन तर मध्येच पाऊस असतो. त्यामुळे श्रावणात सगळीकडेच कसं प्रसन्न वातावरण असतं. या दिवसात सणांची रेलचेल असते.श्रावणी सोमवार, शुक्रवार, शनिवार हे काही महिलांचे उपवासाचे दिवस तर नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आणि गंमत म्हणजे मंगळागौर.. थोडक्यात काय तर हे सण म्हणजे महिलांचे नटण्या-मुरडण्याचे दिवस. सारं काही महिला हौसेने करतात. याची आधुनिक आणि पारंपरिक सांगड कशी घालायची हे पाहू या.

हिंदू पंचांगाचा प्रारंभ चैत्र मासापासून होतो. चैत्र मासापासून पाचवा महिना हा श्रावण मास असतो. ज्योतिष्य शास्त्रानुसार या महिन्यातील पौर्णिमेपासून आकाशात श्रवण नक्षत्राचे योग तयार होत असतो. त्यामुळे श्रवण नक्षत्राच्या नावावरून या महिन्याचे नाव श्रावण असं ठेवण्यात आलं. या महिन्यापासून चातुर्मासाची सुरुवात होते. तसंच हा महिना चातुर्मासातील चार महिन्यांपैकी अतिशय शुभ असा महिना मानला गेला आहे. धार्मिक दृष्टीने चातुर्मासाचे खूप महत्त्व आहे.

I think this answer help you

Similar questions