essay on summer vacations in Marathi
Answers
Answer:
उन्हाळा म्हणजे सुट्ट्याच! उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे सर्वांसाठी एक पर्वणीच असते. वर्षभर शाळा आणि क्लासेस करून विद्यार्थी पुरता थकून गेलेला असतो. त्याचा कंटाळा जाऊन नवा उत्साह संचारित होण्यासाठी उन्हाळ्याची सुट्टी कामी येते. उन्हाळ्याची सुट्टी नुसती झोपून घालवण्यापेक्षा आणि सूर्याला, उन्हाला दोषणे देण्यापेक्षा मी नवनवीन कला आणि खेळ शिकून ती व्यतित करू शकतो, असे मी यावेळी ठरवले.
या उन्हाळ्यात जरा जास्तच खेळायचे, पोहायला शिकायचे आणि खूप मज्जा करायची, असा विचार करतच शेवटचा परीक्षेचा पेपर दिला आणि उड्या मारतच घरी पोहचलो. सर्वप्रथम वेळापत्रक तयार केले. सर्व उन्हाळ्यात काय काय करायचे याचे नियोजन देखील केले. माझा छोटा भाऊ आणि मी दोघे मिळून हे सर्व करत होतो. दोघांच्या सहमतीनुसार आणि वडिलांच्या मान्यतेने आम्हाला दिवसभर खूप ठिकाणी फिरायला मिळणार होते.
एप्रिल महिन्यातच आम्ही मामाच्या गावी गेलो. तेथे मला मामाने पोहायला शिकवले. मी रोज दोन तास मनमुराद पोहायचो. पोहणे मला खूप आवडू लागले. अशातच तेथे रानात फिरणे आणि रोज नवीन गोष्टी ऐकणे असा रोजचा कार्यक्रम होता. मामाच्या गावी गेल्यावर वडील सोबत नसल्याने आमच्यावर बंधन घालणारे कोणीच नव्हते. तेथे आम्ही
खूपच खेळलो आणि बागडलो.
रात्री घराबाहेर झोपण्यात तर खूपच मज्जा यायची. दहा दिवस राहिल्यावर आम्ही पुन्हा आमच्या घरी आलो. या उन्हाळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे मी पोहायला शिकलो. मला अगोदर पोहायची खूपच भीती वाटायची पण आता मी पोहण्यात पटाईत झालो आहे. आमच्या शेजारी एक छोटी विहीर आहे तेथे आता आमची दररोज अंघोळ असायची.
क्रिकेट खेळणे हा तर आमचा नित्यक्रम!क्रिकेटमध्ये रोज नवीन बाबी शिकत राहणे एवढेच माझे काम असायचे. मी मोबाईलवर क्रिकेटचे व्हिडिओ पाहायचो. नवनवीन क्रिकेट खेळण्याचे तंत्र आणि कौशल्य विकसित करत होतो. माझे वडील हेदेखील क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत त्यामुळे त्यांच्यातर्फे थोडासुद्धा विरोध नसतो.
सकाळी पोहणे, त्यानंतर जेवण झाल्यानंतर कॅरम आणि सायंकाळी क्रिकेट असा संपूर्ण दिवस हा खूपच मज्जा करत निघून जातो. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी भरपूर आंबे खाल्ले. दुपारी मी भरपूर जेवत होतो. दुपारी जेवणात दही आणि कोशिंबिरीचा स्वाद तसेच जेवण झाल्यानंतर लस्सी! म्हणजे स्वर्गच प्राप्त झाल्याचा आनंद व्हायचा.
मामाच्या गावी गेल्यावर आणि क्रिकेट खेळताना मी खूप नवनवीन मित्रदेखील बनवले. या वेळी आणखी एक गोष्ट शिकलो ती म्हणजे संगणक! आमच्यात संगणक नाहीये पण शेजारी राहणारा नवीन मित्र केतन, त्याने मला थोडा थोडा संगणक वापरायला शिकवले आहे. पोहणे, क्रिकेट, कॅरम, संगणक यातच माझी सुट्टी अत्यंत आनंदात साजरी झाली.
उन्हाळ्याची सुट्टी प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे साजरा करत असतो. मी माझी उन्हाळ्याची सुट्टी कशी साजरी केली (How I Spent My Summer Vacation Essay) या निबंधाचा तुम्ही संदर्भ घेऊन तुमची सुट्टी योग्य त्या शब्दात मांडू शकता. तुम्हाला हा निबंध आवडल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा…
Answer:
उन्हाळी सुट्ट्या ह्या सर्वच शाळकरी मुलांसाठी स्वतःच्या आणि आजूबाजूच्या वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. कारण या उन्हाळ्या मध्ये शाळेला, महाविद्यालयांना सुट्टी दिली जाते. मग अभ्यासाचे टेन्शन नाही ना कुठल्या परीक्षेचा ताण नाही त्यामुळे आमचे मानसिक स्थिती ही शांत असते.
काही मुले उन्हाळी सुट्ट्या आपल्या पद्धतीने घालवितात. पण मी या वेळेस च्या उन्हाळी सुट्ट्या या माझ्या आजी-आजोबा आणि मामा सोबत घालविणार आहे. कारण वर्षभर अभ्यास, परीक्षा यांच्या ताणामुळे मला कंटाळा आल्या सारखे वाटत आहे.
आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या हीच वेळ आम्हा विद्यार्थ्यांन साठी आराम करण्याची आहे. आणि मी दरवर्षी उन्हाळ्या सुट्ट्यांमध्ये आजी-आजोबांकडे जात असतो. म्हणून कदाचित उन्हाळा ऋतु मला खूप आवडतो. उन्हाळा ऋतु मध्ये वाढलेला भयंकर तापमान आणि त्याचबरोबर येणारी उन्हाळी सुट्टी हि मला खूप आनंद दायक वाटते.
कारण उन्हाळ्याच्या सुट्टीत मी क्रिकेट, खो-खो, कॅरम यांसारखे मैदानी व बैठे खेळ खेळत असतो. कडक ऊन आणि त्यात थंड काही तर पेय किंवा आईस्क्रीम खाण्यात वेगळीच मज्जा असते. आणि उन्हाळ्याच्या दिवसात घरी कोण पाहुणा आला की, आई त्याला थंड काहीतरी पेय सरबत किंवा रसना देत असते आणि सोबत मला पण देते उन्हाळ्यातील हे थंड पेय मला खूप आवडते.
या कोल्ड्रिंक्स मुळे मी उन्हाळ्या ऋतु ची आतुरतेने वाट पाहत असतो. बाहेर कडाक्याचे ऊन आणि घरामध्ये थंड हवेत फॅन, कुलर अथवा ए.सी. खाली बसून टी.व्ही. बघण्याची मज्जा ही वेगळीच असते.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यां मध्ये मी माझ्या मामाच्या गावाला जातो. मामाचे गाव हे कर्नाटक राज्यात मध्ये येथे. जाण्यासाठी रेल्वे ने प्रवास करावा लागतो. आणि मला रेल्वेचा प्रवास खूप आवडतो. वर्षातून एकदा म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यां मध्येच मी माझ्या मामाच्या गावाला जातो. तेथे गेल्याने आम्ही खूप मज्जा करीत असतो.
उन्हाळ्याच्या कडक दिवसात मी आणि माझ्या मामाची मुले घरा शेजारीच असणाऱ्या बगीच्या मध्ये जातो. बगीच्यामध्ये वेगवेगळी झाडे असल्याचे बगीचाचा परिसर हा अतिशय थंड असतो. वर्षभर अभ्यास करून कंटाळलेल्या स्थितीत काहीतरी नवीन म्हणून उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आम्ही नव- नवीन गोष्टी शिकतो.
तसेच आम्ही सर्वजण मिळून उन्हाळ्याच्या सुट्टीत आजूबाजूच्या परिसरात फिरायला जातो. मामाच्या गावा मधून छोटीशी नदी वाहतो. पावसाळ्यात या नदीला खूप पाणी असते व जसजसा उन्हाळा चालू होतो या नदी पात्रातील पाणी आटायला लागते.
पण थोड्या फार प्रमाणात पाणी असल्याने आम्ही सकाळ सकाळी या नदी मध्ये पोहण्यासाठी जातो. मी पोहण्याचे कौशल्य उन्हाळा सुट्टी मध्येच शिकलो आहे. संध्याकाळच्या वेळेस ऊन उतरल्याने आम्ही गावामध्ये जातो. गावामध्ये विठ्ठल- रुक्मिणी चे मोठे मंदिर आहे. आम्ही त्या मंदिरात जाऊन दर्शन घेतो व जरा वेळ मंदिराच्या परिसरात बसुन मग घरी परत येतो.
उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही खूप धमाल करतो. नवीन वस्तू, कपडे यांची खरेदी करतो. फळांचा राजा म्हणून ओळखले जाणारे फळ आंबा हा उन्हाळ्या मध्येच येतो. आंब्याचा आनंद हा उन्हाळ्या मध्येच घेतात. अंबा हे माझे आवडते फळ आहे. म्हणून मला उन्हाळ्यात आंबा खूप आवडतो. तसेच कैऱ्या, चिंचा, पेरू हे सुद्धा उन्हाळ्यातच येतात आणि ते खाण्याची वेगळीच मज्जा आहे.
उन्हाळ्या ऋतूत लग्न समारंभ खूप मोठ्या प्रमाणात होत असतात. दरवर्षी आम्ही चार- पाच लग्नात तर जात असतो. माझे लहान बहिण- भाऊ भातुकलीचा खेळ खेळतात आणि मी सुद्धा त्यांच्या मध्ये लहान मुलां सारखे खेळ खेळत असतो. उन्हाळ्या सुट्टीत माझ्या आवडीची अनेक फळे बाजारात येतात.
अननस, कलिंगड, टरबूज, द्राक्षे यांसारखी मनाला तृप्त करणारी फळे उन्हाळ्या ऋतू मध्ये येतात आणि ते मला खूप आवडतात. मी या फळांचा ज्यूस करून फ्रीज मध्ये ठेवतो व भर उन्हाच्या वेळेस सर्वांसोबत पीत असतो. व सायंकाळी थोडे ऊन उतरले की मी माझ्या मामा सोबत क्रिकेट खेळतो. मामांनाही दहा दिवस उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळतात त्या मध्ये मामा आम्हाला सिनेमा, नाटक बघायला घेऊन जातात सोबत आईस्क्रीम कोल्ड्रिंक पाजतात.
रात्री झोपण्याच्या वेळेस आजी- आजोबा आम्हाला त्यांच्या काळातील प्राचीन कथा सांगतात. व सोबतच देवाच्या पौराणिक काहण्या सोबत सांगतात. आजी- आजोबांच्या या कहाण्या ऐकत ऐकतच आम्ही झोपे जात होतो. माझ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या ह्या खूप आनंदात जातात.
हातातील मोबाईल व्हाट्सअप, फेसबुक या सर्वांतून डोके बाहेर काढून आपल्या कुटुंबाच्या सहवासात राहण्यात वेगळीच मज्जा अनुभवायला मिळते. वर्षभर दूर राहिलेल्या आजी- आजोबांना ही आम्हाला पाहून आनंद मिळतो. नव- नवीन गोष्टी बघायला आणि शिकायला मिळतात. मित्र- मैत्रिणींचा सहवास लागतो.
उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे खरच मौज, मजेची असते मौज, मजेसोबतच काहीतरी नवीन शिकायला सुद्धा मिळते. माझी मोठी बहीण उन्हाळ्या सुट्ट्यांमध्ये काही ना काही शिकत असते. या वर्षी ती स्वयंपाक म्हणजेच नव- नवीन पदार्थ आणि मेहंदी काढायला शिकत आहे. या उन्हाळ्या सुट्ट्यांचा आनंद तर मिळतोच पण सोबत नव- नवीन कौशल्य सुद्धा शिकायला मिळतात.
तसेच परीक्षाच निकाल सुद्धा या उन्हाळ्या सुट्ट्यांत लागतो. तो म्हणजेच १ मे या दिवशी मग परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झाल्यास आई- बाबा आणखी लाड करतात. म्हणून माझ्यासाठी उन्हाळ्या सुट्ट्या ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. याच वर्षीच नव्हे तर अनेक वर्षेंचा म्हणजे लहानपणा पासून ते आत्ता पर्यंतच्या गोड आठवणींचा संग्रह म्हणजेच माझ्या ” उन्हाळ्या सुट्ट्या “.
म्हणून मला उन्हाळा हा ऋतू आवडतो आणि उन्हाळ्या सुट्ट्या सुद्धा. मी या सुट्टींचा नक्कीच चांगला फायदा करून घेऊन आनंदमयी आणि तणाव मुक्त उन्हाळ्या सुट्ट्या माझ्या कुटुंबा सोबत घालविण्याचा प्रयत्न करेन.