India Languages, asked by yadavdevesh1815, 8 months ago

Essay on swapne nastil tar in marathi

Answers

Answered by ashokkumarr1031986
3

Answer:

आपण सगळेचजण रोज काही न काही स्वप्नं पाहत असतो. हे सगळे स्वप्नं खूप महत्वपूर्ण असतात.स्वप्नांची दुनिया ही खूप आनंद देणारी, वेगळी व आपले मनोरंजक करणारी असते. अशा वेळी, जर स्वप्नं नसते तर, लोकांचे फार नुकसान झाले असते.

यशस्वी लोकांनी आपल्या यशाची स्वप्नं पाहिली, त्यामुळे ते त्यांची कामं करण्यासाठी प्रोत्साहित झाले व त्यांना यश मिळाले.स्वप्नं नसते तर, आपल्याला आपले ध्येय गाठण्यासाठी प्रोत्साहन कुठून मिळणार?

स्वप्नं कधीकधी चांगली असतात तर कधी वाईट, कधी गंभीर असतात तर कधी आपले मनोरंजन करणारे. पण प्रत्येक स्वप्न आपल्याला काही न काही शिकवतो. स्वप्नं नसते तर, जीवनात आनंद राहणार नाही,आपल्या कल्पनाशक्तिवर वाईट परिणाम झाल्या असता.

स्वप्नं पाहताना आपल्याला कोणाची रोकठोक नसते, आपल्यावर कोणी निर्बंध टाकत नाही. त्यामुळे आपला आत्मविश्वास नक्कीच वाढतो.स्वप्नं नसते तर, आपला आत्मविश्वास कमी झाल्या असता.

स्वप्नांमुळे आपले विचार सकारात्मक बनतात.वास्तविक जगात ज्या गोष्टी आपल्याकडून शक्य नसतात. त्या गोष्टी स्वप्ननांमध्ये शक्य होतात. तेव्हा, आपल्याला आनंद आणि सुख मिळते.स्वप्नं नसते तर आपल्या मानसिकतेवर वाईट परिणाम झाल्या असता.

अशा प्रकारे, स्वप्नं खूप महत्वाची असून स्वप्नं ही हवीच.

this is the answer please mark me as a brain list

Similar questions