India Languages, asked by karu840, 7 months ago

essay on time management in marathi​

Answers

Answered by Anonymous
16

Explanation:

वेळेचे महत्त्व (Importance of Time): पृथ्वीवर सर्वाना समान

६० मान टाईम आह - ६१ मत्षेदास पाह्ी के एक मिनिट, मिनिटाचा एक तास, १,४४० मिनिटाचा एक आणि ५,२५,६०० मिनिटाचा एक वर्ष. आता ते आपल्या हातात आहे की आपण त्याचा कसा वापर करतो.

जीवनाचे सार्थक करावयाचे असेल, जीवनाला काही अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल, तर वेळेचे नियोजन करणे, वेळेचे महत्त्व जाणून घेणे अत्यावश्यक आहे.

वेळ कोणासाठी थांबत नाही. वेळ ही सतत पुढे जातच असते जसा एकदा सुटलेला बाण मागे घेता येत नाही त्याप्रमाणेच एकदा सरकलेल मिनिट पुन्हा हाती लागत नाही आणि हे मिनिट तुमच, माझ, सर्वाच सारखच असतं तरीही आपण असे वागतो की जणू काही आपण या एक मिनिटाची लांबी रूंदीच बदलतो आहोत.

Answered by SanayaKapoor143
1

Answer:

प्रस्तावना

आपल्या जीवनात सर्व गोष्टींपैकी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ आहे. कोणत्याही व्यक्तीला वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. त्याने त्याचा गैरवापर नाही केला पाहिजे. वेळ ही पैशापेक्ष्या जास्त किमतीची आहे.

जर आपण पैसे खर्च केले तर परत कमावून मिळवू शकतो. परंतु एकदा गेलेलं वेळ पुन्हा कधीच परत येत नाही. वेळ ही कधी कोणासाठी थांबत नाही. म्हणून आपल्याला अमूल्य वेळेचा उपयोग करून घेतला पाहिजे.

हिऱ्यापेक्षा मौल्यवान

वेळ पैश्यापेक्षा आणि हिऱ्यापेक्षा मौल्यवान आहे. कारण जर एकदा वेळ निघून गेली तर परत येत नाही. जर एखाद्या व्यक्तीकडे जास्त पैसा असेल आणि ती व्यक्ती जगातील कोणतीही वस्तू विकत घेऊ शकते.

पण ती व्यक्ती वेळ कधीही विकत घेऊ शकत नाही. जर एखाद्या व्यक्ती वेळेची किमत नाही समजू शकला तर त्याला वेळेचे महत्त्व कधीच वाटणार नाही. जर आपण वेळ वाया घालवत राहिलो तर आपण आपल्या जीवनामध्ये काहीच करू शकत नाही.

वेळेचा उपयोग

प्रत्येक व्यक्तीला वेळेचा चांगल्या प्रकारे उपयोग केला पाहिजे. आपली सर्व कामे वेळेत केली पाहिजेत. त्याच बरोबर स्वतःला शिस्त लावून घेणे आवश्यक आहे.

शाळेत किंवा ऑफिसला जाताना. घरातील सर्व कामे वेळेत केली पाहिजेत. तसेच वेळेवर उठणे, झोपणे, वेळेत आहार घेणे आणि ठरलेली कामे वेळेत करणे गरजेचे आहे. म्हणून संत कबीर यांनी म्हटले आहे कि –

“कल करे सो आज कर, आज करे सो अब”

Similar questions