Art, asked by tara05, 1 year ago

Essay on topic विज बंद झालि तर... ​

Answers

Answered by halamadrid
148

Answer:

आपल्या जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक पैलूमध्ये विजेचे महत्वपूर्ण योगदान आहे.सार्वजनिक ठिकाणी तसेच आपल्या घरांमध्ये ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.तेव्हा,वीज बंद झाली तर!हा विचारच खूप भयानक आहे.

थोड्या वेळासाठी जरी वीज गेली,तरी लोक बेचैन होतात.तसे बऱ्याच लोकांकडे इन्वर्टर असतोच. पण इन्वर्टरला चार्ज व्हायला सुद्धा विजेचीच गरज लागते.

वीज बंद झाली तर,आपल्याला दिवे,कंदील,मेनबत्त्यांचा वापर करावा लागेल.

आपल्या घरातील टीव्ही,एसी,पंखा,वॉशिंग मशीन,फ्रिज अशी किती तरी उपकरणे ही विजेवर चालतात.जर वीज नसली तर,ही उपकरणे चालणार नाहीत आणि यामुळे आपली पंचाईत होईल.

संगणकाचा उपयोग करून आपण ऑफिसची कामे लवकर करतो. वीज नसल्यामुळे,संगणकसुद्धा वापरता येणार नाही.दवाखाने,रेल्वे स्थानक,विमानतळ अशा वेगवेगळ्या ठिकाणी विजेचा उपयोग विविध गोष्टींसाठी केला जातो. वीज नसली तर लोकांचे फार हाल होतील.

विजेचा आविष्कार हा मानवजातीसाठी एक वरदान ठरला आहे.त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे.वीज नसली तर,लोकांना अधिक परिश्रम आणि वेळ देऊन स्वतःचे काम करावे लागेल.

म्हणून वीज तर असायलच हवी.

Explanation:

Similar questions