Essay on tree conservation in marathi
Answers
खूप खूप झाडे लावू .गार गार सावली मिळवू. फळांची झाडे लावू – गोड गोड फळे खाऊ. फुलांची झाडे लावू. देवाला फुले वाहू. गार गार सावली, गोड गोड फळे, देवाला फुले.. झाडे फ़क़्त एवढेच नाही देत तर झाडामुळे पाउस पडतो. नद्या पाण्याने भरतात . शेते पिकांनी भरतात. डोंगर हिरवे होतात. आपल्याला आनंद देतात. खूप खूप झाडांचे मिळून जंगल होते. मग त्या जंगलात वाघ, सिंह, कोल्हे, हत्ती सगळे प्राणी सुखाने राहतात. पक्षी झाडावर घरटी बांधतात आणि घोट्या छोट्या पिल्लांना त्यात ठेवतात. जंगल नसले तर हि सगळेजण कुठे जातील?
झाडांचे अजून फार फार चांगले उपयोग आहेत. आजी आजोबांचे औषध पण झाडांपासून बनते. आमच्या बागेत जांभळाचे झाड मुद्दाम आणून लावले आहे. आम्ही जांभळ तर खातोच पण त्याचा बियांचा आजीच्या औषधाला उपयोग होतो. आमच्या दारातला कडूनिंब खर तर मला अजिबात आवडत नाही, सारखा कचरा होतो आणि झाडावा लागतो, पण बाबा म्हणतात की कडूनिंब तोडायचा नाही तो फार औषधी असतो, हवा स्वच्छ करतो, पिवळ्या लिंम्बोळ्या पण औषधी, गव्हात कीड लागू नये म्हणून आई कडूनिंबाच्या फांद्या त्यात ठेवते.
माझ्या मामाच्या गावाला तर नारळाची उंच उंच झाडे आहेत. नारळाची झाडे पण आपल्याला फार उपयुक्त असतात. नारळाचे पाणी म्हणजेच शहाळे - आजारी माणसांना देतात. नारळपाणी रक्तविकार नाशक, वात-पित्त नाशक आणि शक्तीवर्धक असते, तसेच त्यात फाइबर, विटामिन आणि खनिज असतात. नारळापासून तेल काढतात, नारळाला श्रीफळ म्हणतात. नारळाला धार्मिक महत्व आहे.
बाप रे केवढे फायदे आहेत झाडाचे.. थांबा थांबा ! अजूनही खूप फायदे आहेत, सांगते हं.. झाडाचे मुळे खूप खूप खोल अगदी जमिनीत जातात. मातीला पकडून ठेवतात. त्यामुळे सोसाट्याचा वारा, जोरदार पावसातही माती वाहून जात नाही, शेते खराब होत नाही.
आपल्या सगळ्यांना अत्तर खूप आवडते. मग चंदनाचे झाड आपल्याला अत्तर देते. वेलदोडे, लवंग, मिरी, दालचिनी, जिरे, तमालपत्रे ही सगळी मसाल्याचे पदार्थ झाडेच देतात…
मग काय – सगळ्यांनी लावायची ना झाडे? मग ह्या पावसाळ्यात झाडे लावूयात. घरासमोर, बागेत, शाळेत कुठेही पण एक तरी झाडं लावायचेच. आणि हो नुसतेच लावायचे नाही तर त्यांना रोज पाणी घालून ती जगवायची सुद्धा.