Essay on tree in Marathi
Answers
Explanation:
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' या तुकारामांच्या ओवीचा कधी विचार केलाय, करायलाच पाहिजे.
वृक्ष(झाड) हा मनुष्यजीवणाचा एक अविभाज्य धटक बनला आहे. झाडे आपल्याला फळे-फुले देतात. झाड अपल्याला सावली देते. ऑक्सिजन पुरवते त्याच्याशिवाय आपलं जगणं अशक्य आहे. वृक्षामुळे हरितगृह परिणाम कमी होतो. झाडांपासून मिळणाऱ्या लाकडाचा इमारत बांधणीसाठी उपयोग होतो. झाडाचे अनेक औषधी उपयोग देखील आहेत. जखम झाल्यावर झाडाचा पाला लावता.
परंतु आजकाल वृक्षतोड खूप वाढली आहे. लोक सर्रास झाडांवर कुऱ्हाडी चालवत आहेत. जंगलांचे प्रमाण कमी होत चालले आहे. याला आपण आळा घातला पाहिजे. वृक्षारोपण केले पाहिजे. २१ मार्च हा दिवस जागतिक वनदीन म्हणून साजरा केला जातो. आपणही वैयक्तिक स्तरावर दर वर्षी एक झाड लावलं तर एका गावात एक जंगल तयार होईल.
'झाडे लावा झाडे जगवा' हे धोरण सगळ्यानी स्वीकारावे हीच एक विनंती.
धन्यवाद...