India Languages, asked by AwesomeRainbow, 1 year ago

Essay on trees in Marathi language (Please type in Marathi only. No English words are allowed in the essay.)

Answers

Answered by dmadhuj
2
आमच्या शेवग्याला सुंदर ,हिरवट पोपटी पालवी फुटली होती.झाड खूप लांबच लांब वाढत होत.प्रत्येक पानावर हिरवी नक्षीदार जाळी होती.पांढऱ्या रंगाचे फुल झाडावर बर्फासारखे दिसत होते .पांढऱ्या शुभ्र फुलाचा फुलोरा उठून दिसत होता .शेवग्याचा बहर बघण्यासारखा होता.जात येत लॊक झाड कडे डोळॆलावून बघत होते.आमच्या शेजारी काकू त्या झाडाला अपशगुणी मनात होत्या.हे झाड तुम्ही तोडून टाका,असे त्या म्हणत.
इतकं सुंदर झाड अन तोडून टाका ! मला काकूंचा रागच आला.मी काही म्हणायच्या अगोदरच माझी आई
म्हणाली "झाड म्हणजे देवाची निर्मिती सगळी झाडे सारखीच ,उलट झाड किती परोपकारी असतात.आपल्या अपशगुणी विचार मुळेच आपल्याला झाड अपशगुणी वाटते .झाड आपल्याला फळ देतात ,सावली पुरवितात ,पक्षाना घर देतात."मी असे पर्यंत हे झाड तोडू देणार नाही .
काकू ला बरोबर वाटले नाही.पण झाडाकडे पाहून आम्हाला समाधान  वाटत होत.
घरट्यानी शेवग्याचे झाड भरून गेले होते .त्यामुळे मला पक्षाना जवळून बघायला मिळत होते .मधमाशा फुलांचा रस चाखण्यासाठी यायच्या आणि मला खुश करून जायच्या.एक तांबट पक्षी यायचा अगदी मान खाली वर करत ,अगदी एकाग्रतेने टुकटुक आवाजाचा टणत्कार करत मला झाडावर दिसायचा .झाडाच्या फांदावर कोकिळा पक्षी कुहू कुहू आवाज करताना मी बघायचो.छोटे छोटे हिरव्या राघूचे थवेच्या थवे अलगत उडत उडत ,हवेत तरंगता मी बघायचो.प्रत्येक ऋतूमध्ये आमचा शेवगा पशु पक्षी किडे किटुक यांनी गजबजलेला असायचा.
वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेक्सवेगळी रूप घेत आमचा शेवगा उभा आहे.माझा आवडता मित्र आहे.मी त्याची खूप निगा राखतो.तो अजबखाना आहे .त्यामुळेच मला नवनवीन पशु पाशी बघायला मिळाले.त्या झाड मुळे मला ज्ञान ,आनंद ,मनोरंजन मिळाले. झाडाच्या हिरव्या रंगामुळे मला प्रसन्नता वाटते .रोज माझा नवी प्रेरणा मिळते .रोज नवीन उत्साह माझ्यात निर्माण होतो .असा हा शेवगा मला जगण्याची नवी उमेद प्रस्तुत करतो

Similar questions