India Languages, asked by ash20629, 9 months ago

Essay on uncleanlineness and pollution in marathi​

Answers

Answered by sanirvinya
1

आजच्या या वैज्ञानिक युगात माणसाला जसे वरदान मिळाले आहे तसेच काही शापही मिळाले आहेत. प्रदूषण हा एक असा शाप आहे जो वैज्ञानिक क्रांतीतूनच जन्माला आला आहे. आज सर्व जगालाच प्रदूषणाच्या या भयंकर समस्येला सामोरे जावे लागत आहे. प्रदूषण हा आज मानव जीवनात एक गंभीर समस्यांचा विषय आहे. मागील काही वर्षांर्पासून प्रदूषण ज्या गतीने वाढत चाललेला आहे की त्यामुळे सर्व जीवांना अनेक अडचणींना सामोरे जाव लागत आहे. प्रदूषण म्हणजे नेमक तरी काय हे आपण ह्या निबंध भाषणांमधून जाणून घेणार आहोत. प्रदूषण एक समस्या हा विषय मुलांना शाळेमध्ये निबंध, भाषण, परिचछेद लेखन, वादविवाद स्पर्धा इत्यादींसाठी सांगितला जातो. ह्या लेखामध्ये आम्ही प्रदूषण ह्या विषयावर निबंध, भाषण दिले आहे. ह्या लेखामध्ये आम्ही प्रदूषण एक समस्या, प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषणाचे प्रकार व उदाहरणे कोणती? तसेच प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला प्रदूषण या विषयावर निबंध, भाषण लिहण्यास उपयुक्त ठरेल. चला तर मग सुरु करूया.

रदूषण एक समस्या मराठी निबंध भाषण लेख प्रदूषण म्हणजे जीवजंतू नष्ट करणारे किंवा विस्कळीत करणारे घटक जे वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळतात.. पृथ्वीजवळ, सुमारे ५० किमी उंचीवर एक उतारमंडल आहे, ज्यामध्ये ओझोनची पातळी आहे. या पातळीमुळे सूर्यप्रकाश अल्ट्राव्हायलेट (यूवी) किरणांपासून मुक्त होऊन पृथ्वीपर्यंत पोचतो. आज ओझोनची पातळी वेगाने विघटित झाली आहे, ओझोनचा थर वायुमंडलीय क्लोरोफ्लोरोकार्बन (सीएफसी) गॅसमुळे विघटित होत आहे. १९८० मध्येओझोन पातळीचे विघटन सर्व पृथ्वीवर होत असल्याचे प्रथम लक्षात आले. दक्षिण ध्रुव विस्तारांमध्ये ओझोन पातळीवरील व्यत्यय 40% -50% आहे. या प्रचंड घटनेला ओझोन होल (ओझोन होल) म्हणतात. ओझोनच्या पातळी कमी झाल्यामुळे ध्रुवीय प्रदेशांवरील बर्फ वितळण्यास सुरवात झाली आहे आणि मनुष्याला अनेक प्रकारच्या त्वचेच्या आजारांचा सामना करावा लागत आहे.

वायू प्रदूषण म्हणजे अशुद्ध हवा वायू प्रदूषण म्‍हणजे वातावरणात घातक दूषित पदार्थ मिश्रित होणे. वायू प्रदूषणामुळे आरोग्‍य समस्‍या उद्भवू शकतात तसेच ह्यामुळे पर्यावरण व संपत्तीची हानी होऊ शकते. वायू प्रदूषणामुळे हवामानात देखील बदल घडून येत आहेत. उद्योग, वाहने, लोकसंख्‍येतील वाढ, आणि शहरीकरण हे वायू प्रदूषणास जबाबदार असणारे काही प्रमुख घटक आहेत. आज ज्या ज्या ठिकाणी कारखाने आहेत तेथील रहिवासी असलेल्या लोकांना दीर्घ आजाराला सामोरे जावे लागत आहे. आपणच आपल्या हाताने प्रदूषणाची समस्या वाढवून ठेवली आहे.

Answered by kavithaanil2003
0

Answer:

प्रदूषण

प्रदूषण अनेक प्रकारचे असते. यामध्ये मृदा प्रदूषण, जलप्रदूषण, वायू प्रदूषण इत्यादींचा समावेश होतो. प्रदूषण टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावणे गरजेचे आहे.वातावरणात पाण्यात, हवेत किंवा अन्‍नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात.

प्रदूषण म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळणे. उदाहरणार्थ, हवेमध्ये डीझेल या इंधनातून सल्फर असलेला धूर ttवातावरणात मिसळतो. यामुळे वातावरणात अतिउच्च असलेल्या ओझोन वायूच्या थराला हानी पोहचून सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर नको असताना पोहचतात. यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो आणि जीवनचक्र ढासळते. परिणामतः जागतिक तापमानवाढ, उष्माघात, त्वचेचा कर्करोग या सारखे धोके निर्माण होतात.

प्रदूषणाची काही महत्त्वाची उदाहरणे : -

पाणी प्रदूषण:अशुद्ध पाणी म्हणजे पाणी प्रदूषण, कारखान्याचे रसायने मिसळेले पाणी तलाव, नदी इत्यादी मध्ये सोडले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषण होते.

हवाप्रदूषण:

ध्वनिप्रदूषण: वाहनांचा ,कारखान्यातील यंत्र , वाहनाचा मोठा कर्कश आवाज तसेच गाण्यांचा मोठा आवाज या मुळे ध्वनी प्रदूषण होते.

सध्या पाणी प्रदूषण हा एक गंभीर प्रश्न समाजासमोर आहे आणि त्यापेक्षा गंभीर परिस्थिती हि सांडपाणी व्यवस्थापनाची आहे.

हवा प्रदूषण हे प्रामुख्याने कारखान्यांमधून निघणारा धूर तसेच गाड्यांमधून निघणारा धूर यांमुळे होते.

मृदा प्रदूषण - यामुळे मातीत असलेली सुपीकता कमी होते आणि त्यात विषारी पदार्थ मिसळले जातात.

Similar questions