essay on : उस्तावाचे बदलते रूप in marathi
plzz answer this question and don't give spam answer and correct answer will be marked as brainliest
Answers
Answer:
उत्सव अथवा सण हे आपल्या सर्वांनाच खुप आवडतात. करण ते आपल्या रोजच्या रुक्ष जीवनातून आपल्याला मोकळीक देतात. काही काळ मुक्तपणे बागडून, आनंदात व्यतीत करून माणूस पुन्हा रोजच्या कामाला उत्साह प्राप्त करून घेतो. म्हणून सणांचे स्थान आपल्या जीवनात खुप m महत्वाचे आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत सणावारांची रेलचेल आहे. प्रत्येक सणामागे धार्मिकतेचि किंवा पौराणिक कथेची जोड आहे; पण आजच्या तरुण पिढीला हे धार्मिक, सामाजिक संदर्भ माहीत नाहीत. त्यामुळे सण म्हणजे नवीन कपडे घालून मिरवणे, एवढीच त्यांची कल्पना आहे. बदलत्या आर्थिक सामाजिक परिस्थितीमुळे व विज्ञाननिष्ठ दृष्टीमुळे हल्ली सणांचे व उत्साहांचे स्वरुप बदलत चालले आहे. यातले काही बदल आपल्याला अस्वस्थ करतात, तर काही बदल आपल्याला चांगले वाटतात.
पूर्वी नागपंचमीला गारूडी जिवंत नाग टोपलीत घेऊन बसायचे; पण ते आज दिसत नाहीत. कारण नाग, साप याबद्दल लोकांना वैज्ञानिक माहिती दिली गेली आहे आणि कायद्याने त्यावर बंदी आणली आहे. संरक्षणाच्या दृष्टीने हा बदल योग्य वाटतो.दहीहंडी हा गोकुळाष्टमीचा वैशिष्ट्यपूर्ण भाग; परंतु आजकाल दहीहंडीला बांधलेले लाख रुपये पैशांची लालूच दाखवतात निर्भेळ आनंद सणापासून दूर गेला असे वाटते. रक्षाबंधनाचा सण ही खूप मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा होतो. राख्या बनवताता विविधता कलात्मकता आढळते.
सार्वजनिक गणेशोत्सव हा तर सर्वांत उत्साहपूर्व सोहळा असतो. आजकाल हा उत्सव दिव्यांच्या रोषणाईने झगमगत असतो. सजावटीसाठी थर्माकोलची तऱ्हातऱ्हांची मखरे, सोन्या-चांदीच्या दूर्वा, मोठ-मोठेगणेश मूर्ती त्यांची सजावट या सार्यात लाखो रुपयांची उलढाल चालू असते. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव चालू केला,तेव्हा मेळ व्याख्याने असे कार्यक्रम असत. आज का सिनेमा, आर्केस्ट्रा अशा तऱ्हेच्या कार्यक्रमांची रेलचेल आढळते. मिरवणुकीत सुद्धा वाटेल तसे नाच, खुप आवाज असे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे बदलते स्वरूप काही फारसे आवडणारे नाही.
हल्ली नवरात्रोत्सवात ही पारंपारिक रास-गरबा त्यांचे सौंदर्य लोप पावत आहे. त्यांची जागा हजार रुपयांची तिकिटे, बक्षिसे लावून, फिल्मी सितार यांनी आमंत्रित करून पाश्चात्य पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या डिस्को दांडिया घेतली आहे. व्यापारी वृत्ती मुळे हा असा बदलता रंग आपण अनुभवतो.
दिवाळीला बनवणारे शेव, चिवडा, चकली, लाडू हे पदार्थ आजकाल बाराही महिने केले जातात. त्यामुळे दिवाळी म्हणून या पदार्थांचे अप्रूप राहिलेले नाही.आजकाल दिवाळी पहाट म्हणून बऱ्याच ठिकाणी संगीत मैफली आयोजित केल्या जातात. मातीच्या पणत्या ऐवजी मेणाच्या पणत्या वापरल्या जातात . थर्माकोलचे कंदील हे आजकालचे वैशिष्ट्ये झाले आहे.
मंगळागौरीच्या पूजासुद्धा आजकाल सुटसुटीत बनत चालले आहेत. नोकरी करीत असलेल्या मुलींना रजा नसतात. पूर्वीच्या काळी मुली रात्रभर जागत, निरनिराळे खेळ खेळत.आजकल पुन्हा गरजेचा प्रश्न असल्याने रात्री जागणे यालासुद्धा फाटा दिला जाऊ लागला आहे.पूर्वीप्रमाणे हल्ली पाच वर्षे मंगळागौरी पुजल्या जात नाहीत. हा सगळा बदलते सामाजिक परिस्थितीचा परिणाम आहे.
कालानुरूप सणांचे स्वरूप बदलत जाणारच. शहरातले जीवन धावपळीचे, धकाधकीचे असते. त्यामुळे असे सण साजरे करीत बसायला लोकांजवळ निवांतपणा नसतो. धावपळीचे जीवन, वाढती महागाई यामुळे सण साग्रसंगीत करण्याऐवजी सुटसुटीतपणे साजरा करण्याकडे लोकांचा कल आहे.आजकाल गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, नाताळ सर्व सणांमध्ये सर्व धर्माचे लोक सहभागी होऊ लागले आहेत. हा एक चांगला बदल आहे.
तेव्हाचं व उत्सवाचे बदलते स्वरूप आपण डोळसपणे समजून घेतले पाहिजे. उत्सव ऐक्याचे, साधन प्रसन्नतेची प्रेरक, भावनांचे संवर्धन असतात. आपली संस्कृती टिकवण्याचे उत्सव सणांचा मोठा हातभार असतो. तो आपल्या जीवनातील निरसता दूर करून नवचैतन्य निर्माण करतात.म्हणून त्यांचे आपण बदलत्या स्वरूपात सुद्धा स्वागत केले पाहिजे.
आपण महाराष्ट्रीय माणसं तशी खूपच उत्सवप्रिय आहोत. अनेक सण- उत्सव खूप आनंदात साजरे करतो; पण गेल्या काही वर्षांत उत्सव साजरे करण्याची आपली पध्दत बदलत चालली आहे. अर्थातच आनंद मिळवण्याची व्याख्याही बदलली आहे.
साधारणपणे वर्षात साजरे होणारे प्रमुख सण, उत्सव म्हटले म्हणजे- श्रीकृष्ण जन्मोत्सव- दहीहंडी. गणेशोत्सव, नवरात्र उत्सव तोच दुर्गा उत्सव, दीपोत्सव अर्थातच दिवाळी. त्यानंतर शेवटी होलिकोत्सव. होळी.
गोकुळाष्टमी- दहिहंडी, खरंतर हा बालगोपाळांचा उत्सव; पण गेल्या काही वर्षांत. मोठ्या शहरांत हा उत्सव तरुण खूप मोठ्या स्वरूपात साजरा करतात. आता त्यात राजकीय मंडळीचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढलाय. मंडळाना आर्थिक पाठबळ देण्याबरोबरच प्रत्यक्ष सहभाग वाढलाय. मोठी बक्षिसे दिली जातात. त्यामुळे स्पर्धा वाढली. बक्षिसांच्या मोहापायी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदाचे थर वाढतात. तो जीवघेणा प्रकार झाला आहे. शेकडोवारी गोविंदा पडून जखमी होतात. त्यात काही मृत्यमुखी पडतात. काहींना अपंगत्व येते. खरा उद्देश बाजूला होऊन, सेलिब्रेटीचा डान्स बघायला गर्दी जमते. राजकीय नेते मंचावर ताल धरतात. बर्याचदा बेताल वक्तव्य करतात. वाद उपस्थित होतात. राजकीय व्यक्तिंच्या प्रवेशामुळे, पाठबळामुळे उत्सवाला हिडीस स्वरूप आले आहे हे सत्य नाकारता येणार नाही.
गणेशोत्सव, आणि नवरात्री उत्सव म्हणजेच दुर्गाउत्सव हे महाराष्ट्रात सर्वदूर साजरे होणारे प्रमुख उत्सव. सर्वचजण त्याची आतुरतेने वाट बघत असतात.
गणेशोत्सव हा तर महाराष्ट्रातला सगळ्यांचा आवडता आणि मोठा उत्सव. ज्या त्या भागात प्रथेप्रमाणे तो साजरा केला जातो. कुठे दिड दिवस कुठे पाच, सात, तर कुठे अनंत चतुर्दशीपर्यंत असतो. कोकणात दीडच दिवसाचा गणपती असतो; पण खूप उत्साह असतो.
एकूणच विचार केला, तर सध्याच्या परिस्थितीत या उत्सवाचे स्वरूप खूप बदलले आहे. धार्मिकतेपेक्षा इतर गोष्टींना महत्त्व दिले जाते. मोठ्या मूर्ती, देखावे, झगमगाट, रोषणाई, डी.जे.च्या तालावर कर्कश्य गाणी, हे प्रमाण वाढले आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या विचारांनी घरातल्या गणपती बरोबरीने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, त्याचा जवळपास विसर पडला आहे. अगदीच तुरळक मंडळात गणपती अथर्वशीर्षाचे पठण होते. काही वर्षांपूर्वी गणेश व्याख्यानमाला सारखे उपक्रम केले जात होते. निरनिराळ्या विषयांवरचे विचार ऐकायला मिळायचे. देखावे, रोषणाई, तर करावीच; पण या गोष्टींनाही प्राधान्य द्यावे.डी.जे.च्या कर्कष्य तालावर जी गाणी लावली जातात, तो प्रकार कुठेतरी थांबावा असे वाटते. उत्सव साजरा करण्यातूनच आनंद, समाधान, जरूर मिळायला हवे; पण त्यापासून कोणाला त्रास होणार नाही हा विचारही असायला हवा. नवरात्र- दुर्गा उत्सवाची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. दिवसभर कर्कश्य आवाजात गाणी.डी.जे., गरबा, दांडीया. बस. दिखावा, इव्हेंट, म्हणूनच हा उत्सव साजरा केला जातो म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. या उत्सवामागचे खर्या धार्मिक महत्त्वाचा विसरच पडत चाललाय.
दिवाळी म्हणजे मनाच्या आनंदाचा उत्सव. दिवाळीच्या दीपोत्सवात मन उजळून निघते. सगळ्या कुटुंबातील सदस्यांनी एकत्रित येऊन साजरा करण्याचा सण, उत्सव. एकत्रित येऊन, आई, काकू, पत्नीच्या हातची चकली, शेव, अनारसे, चिवडा, करंजी, सांजोरी, पदार्थांचा आस्वाद घ्यायचा. धनत्रयोदशी, लक्ष्मी पूजन, भाऊबिज, साजरे करायचे. दारी पणत्यांची आरास, झेंडूच्या फुलांचे हार, तोरणे, फटाक्यांची आतषबाजी, सारी मजाच न्यारी होती; पण आजच्या धकाधकीच्या जीवन प्रणालीत एकत्रित येणे जमत नाही. अनेक जण पर्यटनस्थळी जाऊन दिवाळी साजरी करतात. फराळाचे पदार्थ आयते आँन लाईन मागवतात. काळाचा बदल म्हणता तो हाच बघायला मिळतो.
होलीकोत्सव म्हणजे आपसातले मतभेद विसरून दुर्गुणांची होळी करायची. या उद्देशाचाही विसर पडलाय.
सगळे सण, उत्सव साजरे करत असताना सामाजिक भान म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. जसे कर्कश्य वाद्यांपासून ध्वनी प्रदूषण, मोठे फटाके, मोठ्या प्रमाणात रोषणाई यांपासून वायू प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. सात्विकपणे आपल्या संस्कृतीला शोभेल असेच उत्सव साजरे करायला हवेत. कुठलेही अपप्रकार घडणार नाही, अपप्रवृत्तीचा शिरकाव होणार नाही आणि आपण उत्साहात उत्सव साजरे करत असताना, कोणालाही त्रास होणार नाही ही जबाबदारी मंडळाची आहे याचे भान ठेवायला हवे.