Essay on vasanth riru in Marathi
Answers
Answered by
0
hey mate
essay on vasanth Ritu
वसंतोत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव आहे. निसर्ग एरवीही सुंदर असतोच, पण वसंतात त्याचे रूप काही औरच असते. आपल्या जीवनातही तारूण्य हा वसंत ऋतूच असतो. त्याचप्रमाणे वसंत ही निसर्गाची युवावस्था आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. भगवान कृष्णाने गीतेत 'ऋतूनां कुसुमाकरः' असे संबोधले आहे. कवीवर्य जगदेव तर वसंताचे वर्णन करताना थकत नाहीत.
निसर्गाचे आकर्षण एरवी असतेच. पण वसंत ऋतूत त्याचे सौंदर्य जास्त खुलते. आपल्या या सौंदर्य विशेषाने तो आकर्षित करून घेतो. फक्त त्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे.
नेहमीच्या धावपळीच्या जगतातून फुरसतीचे क्षण काढून निसर्गाकडे वळायला हवे. निसर्गाच्या माध्यमातून सतत चलित स्थितीत असणार्या देहाला आराम दिला पाहिजे. निसर्गाकडे एक अजब जादू आहे. त्यामुळे मानवी वेदनांवर त्याचा असा काही असर होतो, की सगळी दुःखे, वेदना पार विसरायला होतात. निसर्गाचे हेच सानिध्य कायम मिळत राहिले तर मग काय मानवी जीवनात बहारच येईल. सहाजिकच त्याचा परिणामही दीर्घकाळ राहिल.
निसर्गात अहंकाराचा लवलेश नाही. म्हणूनच तो ईश्वराच्या जवळ आहे आणि त्याचमुळे आपण जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जातो, तेव्हा ईश्वराच्या जवळ गेल्याचा अनुभव येतो.
निसर्ग सुख आणि दुःखाच्या पलीकडे आहे. वसंत असो वा वर्षा वेगवेगळ्या मार्गाने ईश्वरच पृथ्वीवरून हात फिरवत असतो. आणि त्याच्या या चैतन्यदायी स्पर्शाने सृष्टी फुलून निघते.
जीवनात प्रभू स्पर्श झाला, त्याचा हात फिरला तर आपले जीवनही संपूर्णपणे बदलून जाईल. जीवनात वसंत येईल. दुःख, दैन्य, दारिद्र्य क्षणात दूर होतील. ईश्वराच्या स्पर्श झाल्यानंतर आयुष्यात फक्त एकच ऋतू येतो, तो म्हणजे वसंत.
plz mark as brainlist

Similar questions