Music, asked by mavas, 1 year ago

essay on vruksh naste tar in marathi


mavas: i fear you
mavas: pf my brother what its mean
mavas: sorry
mavas: what was that
mavas: i cant understand
mavas: once a time stay ur real pic
mavas: i want ti know real vajisha

Answers

Answered by yashika221
25
Essay on वृक्ष नष्ट झाले

तरवृक्षाचे नाव एकताच, एकच गाणे आठवते व ते म्हणजे “वृक्षवल्ली आम्हा सोयरी”. परंतु आज हे फक्त गायनातच शिल्लक राहले आहे. निसर्ग आणि पर्यावरण हेच जीवनाचे आधार आहे. वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही. संपूर्ण जगात विकासाच्या नावाखाली अनेक झाडे तोडली जात आहेत. ज्याचे गंभीर परिणाम दिसायला लागले आहेत. आज सर्व प्रदेश, पहाड़,  जंगल हे वृक्ष नष्ट झाल्याने ओसाड पड़ले आहेत. औषधीयुक्त वनस्पतींची दुर्मिळता झाली आहे. वृक्ष नष्ट होत असल्यामुळे पाऊस सुद्धा पडत नाही. या मुळे सृष्टीचे वैभव संकटात पडले आहे.

पाऊस कमी पडल्यामुळे पाणीटंचाई ची समस्या तीव्रतेने जानवत आहे. दूषित पाण्यामुळे रोगराई वाढत आहे. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड़ झाल्यामुळे व नवीन वृक्षांचा लागवड न झाल्यामुळे पर्जन्यमान कमी झाले आहे. शहरात रस्ते दुरूस्ती, रस्तेरुंदी, उंच-उंच इमारतीचे बांधकाम करण्या करता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे, ज्यामुळे उष्णतेचा पारा वाढलेला आहे. देशात कित्येक ठिकाणी तापमान ४५° C पेक्षा अधिक पोहचला आहे. म्हणून विकासाच्या योजना आखताना व शहरीकरण करताना मूलभूत सुविधांकडे, पर्यावरण रक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

जंगल तोडी मुळे जंगलातील प्राणीही बेघर होत आहेत. आणि ते मानवी वस्त्यांमध्ये भक्ष व आसरा शोधत आहेत. आणि यामुळे जैविक आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. हे थांबवण्याकरिता नागरीकांत वृक्षतोडीचे भयानक परिणाम समजावून सांगणे आवश्यक आहे. जंगलाची उपयुक्तता व वृक्षा रोपणाचे फायदे याची माहिती नागरिकात पोहचवलीत पाहिजे.  

जर सर्व झाडे कापून टाकली, तर पाणीची कमी होईल, तापमान वाढणार, रोगराई पसरणार आणि संपूर्ण पर्यावरण नष्ट झाले तर भविष्‍यात पृथ्‍वीचे काय होईल. आणि वुक्षतोडीला जवाबदार ठरणारा मनुष्यच हे सर्व थांबवून सृष्टीला वाचवू शकतो.
Answered by sharvansingkar1
7

Answer:

नमस्कार मित्रांनो आज मराठी निबंध आपल्या साठी झाडे नसती तर हा एक काल्पनिक मराठी निबंध घेऊन आला आहे हा निबंध आपल्यांना झाडे नसली तर काय होईल ह्याची एक कल्पना देतो, तर चला निबंधाला सुरवात करूया.

झाडे नसती तर

रोज प्रमाणे मी आणि माझे गावातील मित्र संध्याकाळी क्रिकेट ची म्याच खेळत होते खूप अटी तटी चा सामना सुरु होता, एक बोलात ४ रेन हवे होते आणि काय अमित ने एक जोरदर शोट मारला मला वाटले हे ४ रेन भेटनार आणि आम्ही जिंककनार.

पण आम्ही हरलो का तर होन्ही ४ रेन अडवले म्हणून नाही तर आमच्या मयदानावर एक झाड आहे ज्याला चेंडू जाऊन अडला, मला फार राग आला आणि मनात विचार आला इथे हे झाड नसत तर आम्ही जिंकले असतो.

मी घरी आला तरी माझ्या मनात त्या म्याच मदे आम्ही झाडा मुळे हरलो हेच होते आणि तेव्हाच माझ्या मनात एक विचित्र कल्पना आली “झाडे नसती तर..” किती बर झाल असत नाही का?.

हि झाडे नसण्याची कल्पना माझ्या मनात घर करू लागली आणि माझ्या मनात विचार येऊ लागले झाडे नसती तर काय-काय झाले असते पहिला विचार आला आम्ही ती क्रिकेट ची म्याच जिंकले असते. नंतर विचार केला मी म्याच तर जिंकला असता पण जर झाडे नसती तर आम्ही जेथे मयदानावर बसतो तिथे जादाची सावली असते आणि तिथे थंडगार वारा असतो पण जर झाडे नसतील तर आम्हाला झाडाची हि थंडगार सावली कशी मिळणार, आणि जर झाडे असणारच नाही तर सगळी कडे कडक उन असेल आणि अशे तर आपल्यांना उनाचे चटके बसतील.

जर झाडेच राहणार नाही तर सुंदर फुलांच्या बागा कश्या बननार, ह्या बागान मदे झाडे नसतील तर केवळ दगड धोंडी असतील आणि जर बागान मदे झाडेच राहणार नाही तर सुंदर पक्षी कसे येणार आणि पक्षी काय खाणार बापरे!.

झाडांन विना आपल्यांना खायला फळ नसतील धान्य नसेल तर आपण खाणार काय? झाडांन बिना जगण कठीण होईल कठीण काय झाडे नसतील तर आपल्यांना ओक्शिजन कशे मिळनार आणि ओक्शिजन नसेल तर आपन जगुच शकत नाही.

झाडे नसतील तर ह्या पृथ्वीवर जगणे शक्य नाही कारण झाडांन बिना आपल्यांना काही खायला मिळणार नाही आपल्यांना प्राण वायू मिळणार नाही. वातावरण उनाने तापून जाईल, वातावरणा मदे वारा वाहणार नाही, झाडे राहणार नाही तर पूर्ण जमीन दगड धोंड्याने भरली असेल एकदम एखाद्या वालवंटा प्रमाणे.

झाडे नसतील तर हि एक भयानक कल्पना आहे. झाडा बिना जीवन शक्य नाही, झाडे आहेत तर जीवन आहे आणि म्हणूनच आपण जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि झाडे तोडली जात असतील तर त्याचा विरोध केला पाहिजे.

Similar questions