India Languages, asked by mms14, 1 year ago

Essay on what we have learnt from saints work.
Please type it in marathi.

Answers

Answered by amanprasad1
1
जन्म : १२७५
मृत्यू :१२९६

हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत. संत ज्ञानेश्वरांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पैठणजवळील आपेगांव येथे झाला. सामान्य लोकांना भगवद्गीता समजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका या नावाने भगवद्गीतेवरनिरूपण/भाषांतर केले. ते ज्ञानेश्वरी या नावाने प्रसिद्ध आहे. भावार्थदीपिका हे भाषांतराचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.ज्ञानेश्वरांनी भगवद्‍गीतेतील विचार-तत्त्वज्ञान सामान्य माणसांना कळावेत म्हणून ‘भावार्थ दीपिका’ म्हणजेच ज्ञानेश्वरीकिंवा ज्ञानदेवी हा ग्रंथ मराठीत लिहिला. कृष्णाच्या अवस्थेचे ज्ञानेश्वरांनी नाट्यमय वर्णन केले आहे. तद्कालीन समाजाने त्यांचा अतिशय छळ करुनही त्या दुःखाचे दर्शन त्यांनी आपल्या लेखनात कुठेच घडविले नाही हे त्यांचे मोठेपण होय.

‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह – या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.

संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदीयेथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.

Similar questions
Math, 8 months ago