India Languages, asked by PragyaTbia, 1 year ago

Essay on zoo in marathi language - प्राणिसंग्रहालयावर निबंध लिहा

Answers

Answered by Mandar17
73

प्राणिसंग्रहालय हे भटक्या वन्यप्राण्यांचे आश्रयस्थान असते. जे वन्यजीव भुकेपायी किंवा तहानेपायी जंगल सोडून शहरात किंवा मानवी वस्तीत येतात त्या प्राण्यांना वन अधिकारी प्राणी संग्रहालयात सोडून देतात, जिथे त्यांचे योग्य प्रकारे जोपासना केली जाते. प्राणिसंग्रहालय हे प्राणिशास्त्र ह्या विषयातील विद्यार्थ्यांना त्यांचा प्रकल्पात माहिती गोळा करण्यात खूप मोलाचे ठरते.  

भारतात सर्वात मोठे प्राणिसंग्रहालय मैसूर येथे आहे. आणि जगातील सगळ्यात प्राचीन आणि मोठे प्राणिसंग्रहालय जर्मनी येथे "Berlin Zoological Garden" ह्या नावाने आहे. प्राणिसंग्रहालय हे पर्यटकांचे लक्ष वेचण्याचे अद्भुत केंद्र असते. पर्यटक प्राणिसंग्रहालयात विविध आणि दुर्मिळ प्राणी अगदी सहजपणे पाहू शकतात. प्राणिसंग्रहालयात विविध प्रकारचे पशु, पक्षी, साप, असतात.

वन्यप्राणी मानवी चेतना आणि प्रेम चांगल्या रीतीने ओळखतात आणि त्याला प्रतिसादही देतात. भारतात, हेमलकसा (महाराष्ट्र) येथे डॉ. प्रकाश आमटे ह्यांचा वन्यजीव पार्क आहे. तिथे ते हिंसक प्राण्यांना सुद्धा आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करतात आणि ते वन्यजीवही त्या प्रेमाला खूप प्रतिसाद देतात. परंतु पर्यटकांनी प्राणिसंग्रहालयात सावधगिरी बाळगलेलीच बरी.

Answered by humanoid1264
36

प्राणीसंग्रहालय हे एक ठिकाण आहे जिथे सामान्य माणसाने प्राणी ठेवतात आणि त्यांचे पालन केले जाते. येथे झुडूमध्ये विविध जातींचे पक्षी देखील राखले जातात. प्राणीसंग्रहालयाचा उद्देश आम्हाला दर्शविणे, जगास पाहण्यास सक्षम असणे आणि त्यांना पाहण्याची संधी असणे हा आहे.

Similar questions