Hindi, asked by elisaanthony07, 2 months ago

essay onमाझा आवडता खेळ​

Answers

Answered by arvindgarg374
4

Answer:

खेळ कोणताही असो त्यात मनोरंजना सोबत शरीराचा व्यायाम पण होऊन जातो. खेळामुळे शरीर मजबूत बनते. आपल्या देशात वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळले जातात. जसे हॉकी, टेबल टेनिस, फुटबॉल, हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, बुद्धिबळ इत्यादी. क्रिकेट हा भारतात सर्वात लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ सर्व प्रथम इंग्रजांद्वारे भारतात आला होता. आणि तेव्हा पासून तर आज पर्यंत या खेळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

क्रिकेटचे सामने दोन तऱ्हेचे असतात. एक दिवसीय सामना व पाच दिवसीय सामना. एक दिवसीय सामन्यात दोघी टीम ठरलेल्या ओव्हर खेळतात आणि मॅच चा निर्णय पण त्याच दिवशी कळून जातो. पाच दिवसीय मॅच लांब चालते. यात ओव्हर ची संख्या अनिश्चित असते आणि खेळाडू रोज पाच दिवसापर्यंत खेळतात. क्रिकेट चे सामने दोन संघामध्ये होतात. दोन्ही संघामध्ये 11–11 खेळाडू असतात. क्रिकेट मध्ये दोन अंपायर असतात, अंपायर निर्णय देण्याचे काम करतात. क्रिकेट खेळण्यासाठी मैदान साफ असायला हवे. क्रिकेट भारत, पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड इत्यादी देशात लोकप्रिय आहे. हा खेळ गरीब, श्रीमंत, नेता, अभिनेता, विद्यार्थी, कर्मचारी सर्वानाच आवडतो.

क्रिकेट खेळण्यासाठी चेंडू आणि बॅट आवश्यक असतात. क्रिकेटची मॅच दोघी टीम मध्ये टॉस ने सुरू होते. मॅच च्या ओव्हर ठरलेल्या असतात. प्रत्येक ओव्हर मध्ये 6 बॉल असतात. बॉल टाकण्याचे पण नियम असतात. जर बॉल व्हाईट किंवा बाउन्सर गेला तर त्या बॉल ला नो बॉल घोषित करून, बॅटिंग करणाऱ्या टीम का अतिरिक्त रन दिले जातात.

भारतीय क्रिकेट संघात खूप चांगले चांगले खेळाडू खेळले आहेत. पण आजही सचिन तेंडुलकर ला क्रिकेट चे भगवान म्हणून ओळखले जाते. क्रिकेट प्रेमी साठी सचिन तेंडुलकर हे आवडते खेळाडू आहेत. इत्यादी अनेक कारणांमुळे मला सुद्धा क्रिकेट हा खेळ खूपच आवडतो.

क्रिकेट ची माहिती व अजून निबंध मिळवण्यासाठी>> क्लिक करा

तर मित्रांनो हा होता माझा आवडता खेळ क्रिकेट या विषयावर लिहिलेला मराठी निबंध. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली clap बटणावर नक्की क्लिक करा.

Answered by Genius911
2

माझा आवडता खेळ कबड्डी जगात विविध प्रकारचे खेळ खेळले जातात, निरनिराळ्या खेळांच्या स्पर्धा भरवल्या जातात. क्रिकेट व फुटबॉल, टेनिस यांसारखे खेळांच्या स्पर्धा जगभरातील लोक आवडीने पहातात. क्रिकेट, हॉकी फुटबॉल कितीही लोकप्रिय खेळ असले तरी माझा प्रिय खेळ कबड्डी आहे. हा खेळ आजही गावांत, गल्लीत, शहरातील शाळेत खेळला जातो. प्रत्येक खेळाप्रमाणे कबड्डीत मनोरंजनाबरोबरच व्यायाम पण होतो. अन्य खेळांप्रमाणे याला भारी खेळाच्या सामानाची गरज नसते. 

भारतात प्राचीन काळापासून कबड्डी हा लोकप्रिय खेळ आहे, कबड़ीसाठी फक्त एक क्रीडांगण पाहिजे जे आयताकार साडेबारा मीटर लांब व दहा मीटर रुंद असावे. हा सांघिक खेळ आहे. यात दोन संघ असतात. प्रत्येक संघात १२/१२ खेळाडू असतात. दोन्ही संघाचे खेळाडू भिन्न रंगाचे वेश घालतात. त्यामुळे कोणता खेळाडू कोणत्या संघाचा आहे हे ओळखता येते.

दोन्ही संघांचे संघ कॅप्टन असतात. खेळ सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंचा एकमेकांशी परिचय करून दिला जातो. नाणेफेक करून टॉस केला जातो. नंतर सामना सुरू होतो.  नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम दुसऱ्या संघावर आक्रमण करतो. परंतु सगळे खेळाडू एकदमच मैदानावर येत नाहीत.

आधी सात खेळाडू मैदानात येतात. सर्वात आक्रमक खेळाडू कबड्डी कबड्डी म्हणत विरोधी संघाकडे जातो. आणि त्यातील खेळाडूंना स्पर्श करून दम न सोडता, नियमांचे उल्लंघन न करता आपल्या भागात परत येतो. जर तो सुरक्षित परतला तर विरोधी संघाच्या जितक्या खेळाडूंना त्याने स्पर्श केला ते सगळे बाद समजले जातात. जितके खेळाडू बाद होतात तितके गुण विजयी संघाला मिळतात.

जर खेळाडू विरोधी भागात असेल आणि त्याचा दम मध्येच सुटला तर तो खेळाडू बाद मानला जातो. तसेच विरुद्ध भागात आलेल्या खेळाडूला त्या संघाचे सर्व खेळाडू मिळून पकडण्याचा व बाद करण्याचा प्रयत्न करतात. खेळाचा अवधी ५० मिनीटांचा असतो. जिंकलेल्या संघाला ट्रॉफी देऊन सन्मानित करतात. कबड्डीद्वारे शारीरिक विकासाबरोबरच मानसिक विकास पण होतो. 

Similar questions