Hindi, asked by atulchoudhari292, 4 months ago

*एव्हरेस्टवर भारताचा तिरंगा फडकवणारी पहिली अपंग महिला कोण ?​

Answers

Answered by totaloverdose10
0

Answer:

अरुणिमा सिन्हा एव्हरेस्टवर भारताचा तिरंगा फडकवणारी पहिली अपंग महिला

Explanation:

तिने प्रतिकार केला म्हणून चोरटय़ांना तिच्या गळ्यातली साखळी चोरता आली नाही परिणामवश त्यांनी तिला चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले. समोरून येणाऱ्या ट्रेनने तिच्या पायाचा लचका तोडला. कृत्रिम पाय आणि कंबरेचं दुखणं तिचे सोबती झाले. त्याही अवस्थेत तिने एव्हरेस्ट चढून जाण्याचा विक्रम केला. मध्येच ऑक्सिजन संपलं. कृत्रिम पाय निखळला, तरीही ती जिवंत राहिली कारण समाजासाठी तिच्या हातून अनेक गोष्टी घडणं बाकी होतं. एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या अपंग स्त्रीची, ‘पद्मश्री’ प्राप्त जिद्दी अरुणिमा सिन्हाची ही साहसकथा.

११एप्रिल २०११. लखनौ रेल्वे स्थानकावर नेहमीचीच गर्दी! दिल्लीला जाण्यासाठी अरुणिमा पद्मावती एक्स्प्रेसमध्ये चढली. ट्रेनने वेग घेतला आणि चार-पाच रासवट तरुणांनी अचानक अरुणिमाचे सामान आणि गळ्यातली सोनसाखळी हिसकावण्याच्या हेतूने तिच्याशी झटापट सुरू केली. मुळातच क्रीडापटू असणाऱ्या तिनेही प्रतिकार सुरू केला. पण ती एकटी होती. ती दाद देत नाही असे लक्षात येताच त्या गुंडांचा अहंकार दुखावला. अपमानाने आणि संतापाने पेटून उठलेल्या त्या चार-पाच गुंडांनी तिला खेचत दरवाज्यापर्यंत आणले आणि चालत्या ट्रेनमधून तिला बाहेर फेकून दिले.. ती सात तास तशीच ट्रॅकवर पडून होती. या घटनेत तिने आपला एक पाय गमावला आणि कंबरेच्या हाडाचे दुखणे कायमचे मागे लागले.. पण तिची गोष्ट इथेच संपत नाही. तिने त्या कमतरतेवर मात केली. जिद्द आणि धाडसाच्या जोरावर ‘एव्हरेस्ट’ चढली. त्या अरुणिमाच्या या कर्तृत्वाचा सत्कार नुकताच भारत सरकारने केला तो ‘पद्मश्री’ देऊन!

अरुणिमाच्या तोंडून तिची हकीकत ऐकताना मन संतापाने पेटून उठते, विषण्णतेने झाकोळून जाते पण जसजशी तिची कहाणी पुढे सरकत जाते तसतसे तिच्याविषयी आश्चर्य, कौतुक आणि आदराचीच भावना मनात भरून राहते.

अरुणिमा सिन्हा! उत्तर प्रदेशमधल्या आंबेडकर नगर जिल्ह्य़ातली २३ वर्षीय तरुणी! तिचे वडील भारतीय सन्यदलात होते, पण ती जेमतेम सहा-सात वर्षांची असतानाच त्यांचे निधन झाले. वडिलांच्या जागी आईला नोकरीत सामावून घेतले गेले, पण तरीही आíथक परिस्थिती साधारणच होती. अरुणिमाला एक मोठी बहीण आणि एक धाकटा भाऊ आहे. अरुणिमा शालेय जीवनात उत्तम फुटबॉल आणि व्हॉलीबॉलपटू म्हणून नाव कमावून होती. पुढे अवध विद्यापीठातून कायद्याची पदवी घेत असताना तिने राष्ट्रीय स्पर्धामध्येही आपली चुणूक दाखवली. एलएल.बी.च्या शेवटच्या वर्षांला असतानाच तिने सेन्ट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्समध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता आणि त्यासाठीच्या पूर्वपरीक्षेसाठी ती दिल्लीला निघाली असतानाच ही घटना घडली आणि तिच्या आयुष्याने ३६० अंशात वळण घेतलं.

Similar questions