Examples of sharans lekhen in Marathi
Answers
...
सारांश लेखन म्हणजे पूर्ण धड्याचे सार कमी शब्दात लिहिणे. पाठाला थोडक्यात सांगणे म्हणे सारांश.
उदा- इयत्ता १०वी. विषय - मराठी
पाठ ३: आजी- कुटुंबाचं आगळ
आजी- कुटुंबाचं आगळ ह्या पाठाचे लेखक महेंद्र कदम आहेत. ह्या पाठात लेखक ग्रामीण संस्कृतीवर प्रकाश टाकतात. त्यांनी ह्या पाठात एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्व सांगितले आहे. त्यांनी पाठात ग्रामीण जीवनशैलीचे खूप सुंदर वर्णन केले आहे. गावातील घरं, लोक आणि हळवी मनं ह्या पाठात दर्शवली आहेत. गावात माणसं कशी मानाने जोडली आहे ह्याची ह्या पाठात दर्शन घडते.
लेखक ह्या पाठात आपली कुटुंब प्रमुख आजीचे वर्णन करतात. आजी म्हातारी झाली असून आजही पूर्ण कुटुंबाचा पाय बनून कशी राहिली आहे आणि तिने तिचा मुलांसह नातवांना सुद्धा कसे संस्कार दिले आहेत हे पाठात दिले गेले आहे.
हा पाठ आपल्याला वडीलधाऱ्या माणसाचे घरात असणे किती महत्वपूर्ण आहे हे शिकवतो.