India Languages, asked by pvarshapal123, 9 months ago

फुल बोलू लागले तर निबंध

Answers

Answered by Anonymous
2

Explanation:

नमस्कार मित्रा,

★ फुल बोलू लागले तर (निबंध)-

किती सुंदर कल्पना आहे ना. फक्त विचार केला तरी अंगावर शहारे येतात. एक दिवस आपण असे बागेत बसलेले असावं आज एका फुलाने अचानक आपल्याशी बोलावं. आपली ख्याली-खुशाली विचारावी. त्याच्या आयुष्याबद्दल बोलावं. नवनवीन गोष्टींची ओळख करून द्यावी.

फुल बोलू लागले तर त्यांना त्यांच्या सर्व भावना व्यक्त करता येतील. त्यांचे विचार, त्यांची मते, त्यांना होणारा त्रास, त्यांच्या समस्या सरळ सरळ सांगता येतील. त्यांना तोडणारी संख्या अचानक कमी होईल.

आपल्याला एक नवीन सवंगडी भेटेल. ज्याच्याशी आपण सगळं शेअर करू शकू. आणि जो आपली सगळी गुपित जपून ठेवेल. खूप मज्जा येईल. आपण त्याना आपल्या आयुष्यावद्दल सांगू ते आपल्याला त्यांच्याबद्दल.

ही कल्पना कधी सत्यात उतरली तर जीवनाचे सार्थक होऊन जाईल. आपण स्वप्न तरी पाहत राहूया.

Thank u

hindi thodi si weak thi fir bhi answer kiya so mark as brainliest....

Similar questions