फुलाचे आत्मवृत्त
मुद्दे-
जन्म एका उदयानात- कळीच्या अवस्थेतील जीवन- फुलल्यावर झालेला
आनंद- खोडकर मुलाने तोडणे- थोडा वेळ स्वत:जवळ ठेवणे- कचऱ्यात
फेकून देणे- देवळात स्थान नाही- व्यथा.
Grouptuition
Answers
Answered by
4
फुलाचे आत्मवृत्त.
Explanation:
- अरे! मला या कचऱ्याच्या डब्ब्यातून काढा. मी इथे नाही राहू शकत. मला ओळखले नाही का? मी गुलाबाचे फूल बोलतोय.
- आज माझी अवस्था फार वाईट झाली आहे. आधी मी असा नव्हतो. माझा जन्म एका बागेत झाला होता. आधी मी छोटीशी सुंदर कळी होतो. माझ्यासोबत माझे भावंडसुद्धा होते. आम्ही सगळे एकाच झाडावर वाढलो.
- हळूहळू, माझे रूपांतर एका फूलामध्ये झाले. माझे सौंदर्य आणि सुगंध बागेत लोकांना आकर्षित करायचे. सगळ्यांना मी आवडायचो, याचा मला आनंद व्हायचा.
- एक दिवशी बागेत काही मुले खेळत होती. त्यामधील एका खोडकर मुलाने मला तोडले. मी तेव्हा खूप रडलो. त्याने मला माझ्या कुटुंबापासून लांब केले.
- नंतर तो मुलगा माझ्या शरीरावरील पाकळ्यांसोबत खेळू लागला. त्याने मला काही वेळ स्वतः जवळ ठेवले नंतर मला कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून दिले.
- आज मी खूप दुखी आहे. मला असे जीवन जगायचे नव्हते. मला सुद्धा माझ्या इतर मित्रांसारखे चांगले जीवन जगायचे होते. मला माझे जीवन देवळात घालवायचे होते, असे कचऱ्यात नाही.
- पण, काय करणार? नशीबात जे लिहिले आहे तेच होते.
Similar questions