फुलांचे आत्मवृत्त मराठी
Answers
Answer:
sorry I don't know the answer
मंदिरातून नमस्कार करुन मी बाहेर पडले आणि माझे लक्ष बाहेरच्या बाजूस ठेवलेल्या मोठ्या 'निर्माल्य कलशा' कडे गेले. बऱ्याच कोमेजलेल्या फुलांनी तो कलश भरलेला होता, तरी त्यावर एक गुलाबचे सुंदर फूल होते. मनात आले, “अरे हे फूल पूर्णपणे सुकलेले नाही. अजूनही टवटवीत आहे, मग इथे कसे आले?" असा विचार करतच पुढे निघाले तोच आवाज आला,
“अग बघ ना ! मला इथे पाहून तुलाही आश्चर्य वाटल ना. माझ्या नशीबात इथे पडून राहण्याची काय दुर्दैवी वेळ आली आहे. आज सकाळपर्यंत मी या मंदिराच्या उद्यानात होतो आणि आता येथे निर्माल्याच्या ढिगाऱ्यावर."
या मंदिराच्या स्थापनेपासूनच मंदिराच्या सभोवार उदयान बनवण्यात आले. इथल्या पुजारी बुवांनाही झाडा-पाना-फुलांची मोठी आवड. ताजी फुले देवाच्या पूजेसाठी मिळतील असा विचार करुन त्यांनी व इतर भक्त मंडळींनी उद्यानात वेगवेगळी फुलझाडे लावली. रोज संध्याकाळी मंदिराला भेट देणाऱ्या वृद्धांनी या उद्यानाच्या हिरवळीसाठी कष्ट घेतले आणि आता एका माळीबुवांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. माळीबुवाही दिवसभर या उद्यानात खपत असतात. याच उदयानातील एका रोपावर माझा जन्म झाला.
“माळीबुवांनी खूप काळजी घेतली होती. मी जन्मले तेव्हा अगदी इवलीशी होते. अगदी छोटीशी कळी. अगदी डौलाने बागेत फुलझाडांवर विराजीत होते. पहाटेचा गार वारा माझ्याशी खेळत होता. मला रिझवत होता."
थोडे दिवस कळीच्या रूपात वावरल्यावर मग माझे रूप हळूहळू बदलू लागले. मला उत्सुकता वाटत होती की, मी कशी, केव्हा उमलेन? माझा रंग कसा असेल? भ्रमर येऊन माझ्याशी काय हितगूज करतील, असे अनेक प्रश्न मनात गर्दी करत होते.
शेवटी, आज मी पूर्ण उमलले. कालपर्यंत असणाऱ्या कळीचे एका फुलात रूपांतर झाले. एका टपोऱ्या लाल रंगाच्या गुलाबात. मला माझ्या रंगाचा, रूपाचा अभिमान वाटू लागला. मनात विचार आला की, नुसतेच झाडावर उमलून उदयानाला शोभा देणे, हे जरी माझे कर्तव्य असले तरी देवाच्या चरणांवर अर्पण झाल्याशिवाय माझ्या जन्माचे सार्थक होणार नाही.
इतक्यात, मंदिरात दर्शनासाठी आलेला एक खट्याळ मुलगा आपल्या आई-वडिलांची नजर चुकवत माझ्याजवळ आला आणि त्याने चटकन मला खुडले. मला आत्यंतिक वेदना झाल्या; पण मनात आले – असो, हा मुलगा देवळात जाताना देवाच्या चरणावर मला अर्पण करेल व माझ्या या जन्माचे सार्थक करेल. तो देवाच्या दर्शनासाठी मंदिराच्या दिशेने निघाला; पण इतक्यात बागेत उडणाऱ्या फुलपाखरांकडे त्याचे लक्ष गेले आणि मला त्याने तसेच खाली टाकले. बराच वेळ मी तसाच धुळीत पडून होतो. नंतर एक आजी आल्या. त्यांना वाटले, देवावर वाहिलेले फूल चुकून कुणाच्या तरी हातातून खाली पडले असावे, त्यामुळे त्यांनी मला इथे-तिथे न टाकता या निर्माल्य कलशात आणून टाकले. देवळात जाऊन ईश्वराच्या चरणी अर्पण होण्याचे स्वप्न पाहणारा मी, शेवटची घटका मोजत इथे पडून आहे." एक दीर्घ उसासा टाकत ते फुल गप्प झाले. मला त्या फुलाची कथा ऐकून खूप वाईट वाटले.
Explanation:
hope it's help you...
जय भवानी
जय शिवाजी