'फुलाचे आत्मवृत्त या विषयावर निबंध लिहा.
Answers
Explanation:
आमच्या शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता. यामध्ये मी कविता सादर केली होती आणि त्यामध्ये माझा प्रथम क्रमांक आला प्रथम क्रमांक आल्या मुळे माझा गौरव करण्यात आला व मला एक प्रमाणपत्र व एक फुलांचा गुच्छा देण्यात आला.
मी ते सर्व घरी घेऊन आलो. जरा दमलो होतो म्हणून शांत बसलो. तेव्हा मला अभिनंदन मित्रा असा आवाज आला.अभिनंदन मित्रा हे शब्द ऐकूनच मी खडपडून इकडे तिकडे बघू लागलो पण मला कोणी दिसले नाही.
मग त्या फुलाने म्हटले अरे इकडे तिकडे बघू नकोस मी फुल बोलत आहे. असे या पुलाने म्हटले. फुलाचे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले.त्या नंतर बोलु म्हणाले मला आज तुला काही सांगायचे आहे त्यानंतर मी फुलाचे बोलणे ऐकू लागलो.
नमस्कार मित्रा मी फूल बोलत आहे मला तर तू ओळखतोस ना मी विविध रंगांमध्ये विविध सुगंधा मध्ये असतो माझ्या पृथ्वीवर असंख्य अशा प्रजाती उपलब्ध आहे. या प्रजाती म्हणजे खूप मोठा असा परिवार आहे .
पृथ्वीवर माझा जन्म सुगंध पसरवणारी याकरिता तसेच पर्यावरणातील शोभा वाढवण्याकरिता झाला आहे.
जंगलामध्ये झाडामध्ये परिसरामध्ये कुंडी मधील झाडांवर होते.तेव्हा मी छोटे असते तेव्हा मला कळले असे म्हणतात त्यानंतर मी मोठा झाल्यावर माझी सुंदर बुला मध्ये रुपांतर होते.मला तुम्ही विदर्भामध्ये पाहिलेच असेल तसे गुलाब चंपा चमेली मोगरा झेंडू आणि खूप रूपामध्ये तुम्ही मला तर बघितले नसेल.
सध्या मानवाच्या जीवनामध्ये फुलाला खूप महत्त्व आहे.माझा प्रत्येक ठिकाणी उपयोग मानव करत असतो. मानवाच्या जीवनात ती उपयोगी पडतो
सर्वत्र माझा उपयोग होतो जसे की ऑफीस शाळा लग्न समारंभ कार्यक्रम. शोभेच्या वस्तू म्हणून मला वापरतात. मुली व महिला माझा गजरा म्हणून उपयोग करतात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि मला आपल्या जॉकेट मध्ये वापरत असेल. तेव्हा मला खूप अभिमान व्हायचा.
माझा उपयोग विविध कामासाठी केला जातो.जसे की हार बनवण्याकरिता गुलदस्ते बनवला करिता देवपूजेसाठी स्वागत समारंभ लग्नामध्ये आणि औषधे बनविण्याकरिता सुद्धा माझा वापर होतो. एवढेच नव्हे तर माझ्यापासून विविध खाद्यपदार्थ सुद्धा बनवले जातात. जसे की गुलकंद आणि मसाल्यांच्या पदार्थांमध्ये ही माझा वापर होतो.
आज-काल माझ्यामुळे अनेक जणांना रोजगार सुद्धा उपलब्ध झाले आहे. अनेक जण फुलांची शेती वरून उत्पन्नदेखील मिळवतात. कुणाच्या उपयोगी पडत असले कारणाने मला अतिशय चांगले आणि अभिमान वाटते
मी माणसाच्या खूप उपयोगी पडतो म्हणून मला याची खूप खुशी वाटते पण कधी कधी दुःख सुद्धा होतं कारण तुम्ही कधी बागेमध्ये आला की मला फुललेले पाहून माझ्याकडे तुम्ही पटकन आकर्षित होतात आणि कुणालाही न विचारता तुम्ही पटकन तोडून घेतात. त्यामुळे मला खूप दुःख होते तुम्ही मला माझ्या परिवारां पासून दूर करतात आणि मग मी चिमुन जातो तेव्हा तुम्ही मला दूर फेकून देता.यामुळे मला अतिशय दुःख आणि वेदना होतात.
देवपूजेसाठी सर्वत्र माझा उपयोग होतो. मला तुम्ही देवपूजेसाठी मोठ्या उत्साहाने वापरतात.मला याचा खूप अभिमान वाटतो पण सकाळी मला तुम्ही देवाच्या गळ्यात हार बनवून टाकता आणि रात्र झाली की ती काढून दूर टाकून देता यामुळे मला खूप त्रास होतो.
लग्न समारंभामध्ये जिकडेतिकडे माझा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होते.ज्यावेळेस लग्नाला लागते तेव्हा तुम्ही मला वर-वधू कडे फेकतात,तेव्हा मला खूप राग येतो कारण तुम्ही जेव्हा मला वर-वधू कडे फेकतात तेव्हा मी कुठेही पडतो कोणाच्याही पायाखाली येतो तेव्हा मला खूप कष्ट सहन करावे लागते.
त्यामुळे तुम्ही माझा वापर चांगल्या रीतीने केला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. घेशील ना माझी काळजी एवढे शब्द सांगून फुलाचे बोलणे शांत झाले.फुलाचे हे बोलणे ऐकून मला फुलाचा खूप अभिमान वाटला.आणि आता मी ठरवले की कधीही विनाकारण फुल तोडायचे नाही