फ्लेमिंगो पक्षी विषयी विशिष्ट माहिती लिहा
Answers
Explanation:
फ्लेमिंगो पक्षी फिनिकोपारस; इंग्लिश हा पाणथळ जागी थव्याने राहणारा, फिनिकोप्टेरस जातीतला पक्षी आहे. उंच मान व लांब पाय असलेल्या रोहिताची पिसे गुलाबी किंवा फिक्या गुलाबी रंगाची असतात. याच्या चार प्रजाती अमेरिका खंडांत व दोन प्रजाती आशिया खंडात आढळतात।
जगामध्ये मुख्यत्वे उष्ण कटिबंधात रोहित पक्षी आढळतो. आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर यांची वस्ती आहे. मोठे मोठे हजारोंच्या संख्येने यांचे थवे आढळून येतात. भारतातही हा पक्षी विपुल प्रमाणात आढळतो.
भारतातील स्थान संपादन करा
रोहित पक्षी भारतात स्थानिक स्थलांतर करतात. बहुतांशी रोहित पक्षी हे कच्छच्या रणामधील रहिवासी आहेत. पावसाळ्यामध्ये जेव्हा कच्छच्या रणामध्ये गुढगाभर उथळ पाणी असते अशा ठिकाणी चिखलाचे छोटे छोटे किल्ले उभारून त्यात अंडी घालतात व पिल्लांना वाढवतात. तेथे पाणी व ऊन्ह पुष्कळ असल्याने भरपूर खाद्य असते, त्यामुळे पिल्लाचे पालनपोषण चांगले होते. तसेच कच्छचे रण मानवी वावरापासून दुर असल्याने त्यांची वाढ व्यवस्थित होते. ज्या भागात रोहित पक्षी अंडी घालतात त्या भागाला कच्छमध्ये रोहित पक्ष्यांचे शहर असे म्हणतात. आफ्रिकेत पण व्हिक्टोरिया सरोवर, टांगलिका सरोवरामध्ये रोहित पक्ष्याची अशीच मोठी वसतिस्थाने आहेत.
रोहित पक्ष्याची चोच
पावसाळ्यानंतर कच्छमध्ये पाणी जेव्हा आटते तेव्हा रोहित पक्षी स्थानिक स्थलांतर करतात व देशभर पसरतात. पुण्याजवळील उजनी धरणाच्या पाण्यात रोहित पक्ष्यांना पोषक अश्या उथळ जागा आहेत. तेथे हिवाळ्यात व उन्हाळ्यात कधी कधी रोहित पक्षी आढळून येतात. गुलाबी पंखांचा रोहिट आगाणीपंख म
काही विशिष्ट प्रकारचे शेवाळे खाल्ल्यामुळे राहित पक्ष्याच्या पंखाखाली गुलाबी रंगाची छटा तयार होते. गुलाबी रंग हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे. रोहित पक्ष्याची चोच ही खास असते. चोचीच्या आकारामुळे या पक्ष्याला चिखलामधील खाणे शोधणे अतिशय सोपे जाते. तसेच याच चोचीने ते चिखलाचे घरटेदेखील बनवतात.