फुल सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते नाही फुल ग देह तोडते बाई तोडते घरा दाराला तोरण बांधले बाय बांधते रोज मातीत रसग्रहण लिहा
Answers
Answer:
'रोज मातीत' त्या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे हृदयद्रावक चित्रण सार्थ शब्दात केलेले आहे .कष्टकरी शेतकरी महिला शेतातल्या वाफेत जीव तोडून काम करते .शेतात जीव तोडून लावलेली सोन्यासारखी झेंडूची फुले तोडते. जणूकाही ती शेतकरी महिला तिचा जीव तोडत आहे .आणि त्या फुलांचा सुंदर असा हार बनवून ते संपूर्ण घरादाराला बांधते अशाप्रकारे शेतात अहोरात्र कष्ट करून शेतकरी स्त्री आपल्या संसारातील साऱ्या माणसांना आनंदी राखण्यासाठी झटत असते काळ्याआईच्या खुशीत हिरवेगार पिकांचे स्वप्न पाहात मातीतच नांदत असते
कवयित्री कल्पना दुधाळ यांची रोज मातीत ही अतिशय सुंदर अशी कविता आहे. सदर ओळी या ह्याच कवितेतील आहेत.
प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून कवियत्री एका शेतकरी स्त्रीच्या जीवनातील प्रसंग रेखाटताना दिसतात. एक शेतकरी स्त्री दररोज शेतात राबत असताना तिला आलेले अनुभव व त्या अनुभवा सोबत जगत असताना तिच्या भावना काय असतात ह्या कवितेच्या माध्यमातून कवयित्री आपल्यासमोर प्रस्तुत करतात.
कवितेतील शेतकरी स्त्रीने आपल्या शेतात झेंडूची बाग फुलवली आहे व त्या झेंडूचे फुले तोडत असताना तिला ते फुले सोन्यासारखे वाटतात आणि ती तोडत असताना तिला वेदना देखील होतात आणि म्हणून तिला असे वाटते की हे झेंडूचे फूल तोडत असताना जणू ते स्वतःचा देह तोडत आहे असे तिला वाटते म्हणजे त्या स्त्रीला अगदी मनापासून वेदना होतात.
झेंडूचे फुले तोडून झाल्यानंतर त्या फुलांपासून सुंदर असे तोरण तिला बनवावे असे वाटते आणि ते तोरण आपल्या घराला बांधून घराची शोभा वाढवण्यास तिला आनंद वाटतो. अशाप्रकारे कवयित्री दिलेल्या ओळींच्या माध्यमातून त्या शेतकरी स्त्रीच्या मनातील भावना व्यक्त करताना दिसतात.
रोज मातीत या कविते बद्दल अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा-
https://brainly.in/question/22248390
https://brainly.in/question/25268169
#SPJ3