Sociology, asked by 7bangtan, 10 days ago

फार फार वर्षापूवीची गोष्ट आहे ही. एक व्यापारी होता एके दिवशी तो गावी निघाला. वाटेत त्याला चोर भेटला. चोराने व्यापारयाशी मैत्री केली. दोघेही रात्री एका धर्मशाळेत उतरले. सगळे गाढ झोपल्यावर चोर उठला . त्याने व्यापारयाची पिशवी तपासली..
complete the story
Give the correct answer


Answers

Answered by mad210216
36

कथा लेखन.

Explanation:

कथेचा अपूर्ण भाग खालीलप्रकारे आहे:

  • गुरुजींची शिकवण.
  • त्याला पिशवित भरपूर पैसे आणि दागिने दिसले. ते पाहून त्याच्या मनात चोरी करण्याचा विचार आला. तो ती पिशवी घेऊन धर्मशाळेच्या बाहेर पडला.
  • तेव्हा त्याला मागून कोणीतरी हाक मारली. मागे वळून पाहिले तर, धर्मशाळेमधले एक गुरुजी तिथे उभे होते.त्या गुरुजींनी त्याला थांबायला सांगितले.
  • गुरुजींनी त्याला विचारले, "तुझ्या पिशवीत काय आहे"? तो म्हणाला, "पिशवीत माझे सामान आहे". गुरुजी म्हणाले, "मला खरं सांग,यामध्ये खरंच तुझे सामान आहे?" चोर हळू आवाजात हो म्हणाला.
  • गुरुजी त्याला म्हणाले "हे बघ, मी तुला चोरी करताना पाहिले आहे. म्हणून खोटं बोलू नकोस"
  • चोराची मान शरमेने खाली झाली. गुरुजी म्हणाले, "तू, तुझ्या व्यापारी मित्राच्या सामानाची चोरी करायचा विचार सुद्धा कसा करू शकतो? तुझ्या मित्राने तू चोर आहेस हे माहीत असूनही तुझ्याशी मैत्री केली आणि तू त्याला दगा देतोस. जर तुझ्या मित्राला चोरीबद्दल कळले तर त्याला किती वाईट वाटेल. तो परत कधीही कोणावर विश्वास करू शकणार नाही."
  • चोराला त्याची चूक कळली. त्याने ती पिशवी पुन्हा व्यापाऱ्याच्या बाजूला नेऊन ठेवली.
  • तात्पर्य: चोरी करणे एखादे पाप करण्यासारखे आहे.

Similar questions