Hindi, asked by solavprasanna263, 10 months ago

फुटबॉल या खेळामधील प्रेरणास्थान कोण आहे?

Answers

Answered by rajputayush30
2

Answer:

फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात ११ खेळाडूंचा समावेश असतो. हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळातील खेळाडूंचे उद्दिष्ट असते. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू (गोल करेल) तो संघ विजेता ठरतो.

१९०४ रोजी पॅरिस येथे फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड(हाॅलंड), डेन्मार्क, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड या देशांनी फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन (फिफा) ही संघटना स्थापन केली. इ.स. १८६३ साली फुटबॉल असोसिएशन या इंग्लंडमधील संघटनेने फुटबॉल खेळास नियमबद्ध केले. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन फिफासंघटना करते. या खेळातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धा फुटबॉल विश्वचषक ही होय.

१९६२ च्या जागतिक चषक स्पर्धेत चिली व इटली यांच्यातील सामन्यात पंच म्हणून काम बघणारे इंग्लिश पंच केन ॲस्टन हे रेड व यलो कार्डाचे जनक आहेत. त्यानंतर १९७०च्या जागतिक स्पर्धेत या कार्ड्‌सची सुरुवात झाली आणि त्यानंतर संपूर्ण जगभरात याला मान्यता मिळाली. केवळ फुटबाॅलच नव्हे तर इतर अनेक खेळांमध्ये या रंगीत कार्डांचा वापर केला जातो. फुटबॉल म्हणजे पायचेंडू. पायाने खेळविला जाणारा, हवा भरलेला मोठा कातडी चेंडू. या सांघिक व मैदानी खेळाचे अनेक प्रकार आहे. त्यांपैकी दोन प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे : 1 असोसिएशन फुटबॉल अथवा सॉकर आणि 2 रग्बी.

Similar questions