फळ विक्रेता व ग्राहक यांचा मधील संवाद लिहा.
MARATHI
Answers
Answer:ग्राहकः काका, सफरचंदाचा भाव काय?
फळविक्रेताः २०० रुपये किलो.
ग्राहकः संत्र्याचा भाव काय?
फळविक्रेताः १४५ रुपये डझन.
ग्राहकः १४० रुपयांनी दया.
फळविक्रेताः दादा, नाही परवडत. आम्हाला मालासाठी एकदम पैसे मोजावे लागतात व फळाच्या धंदयात मालही लवकर खराब होतो. दोन्ही बाजूंनी नुकसान आमचेच होते.
ग्राहकः आम्हालाही खिशाचा विचार करावा लागतो.
फळविक्रेता: नाही दादा, तुम्ही सांगता त्या भावातखरच परवडत नाही. परवडत असतं तरनक्की दिलं असतं.
ग्राहकः बरं, असू दे, मला सांगा वेलची केळीकशी दिली?
फळविक्रेताः वीस रुपयाला तीन. चांगली मोठीआहेत.
ग्राहकः मला वाटते मी वेलची केळीच घेतो.मला अर्धा डझन या.
फळविक्रेता: ठीक आहे. कागदात देतो. आता प्लॅस्टिकवर बंदी आली आहे म्हणून पिशव्या नाहीत माझ्याकडे.
ग्राहकः छान, चालेल, दया कागदात गुंडाळून. हे घ्या पैसे. ४० रुपये झाले ना?
फळविक्रेताः दादा, सुट्टे दया हं. तुमच्या हातूनच बोनी होणार आहे. सुट्टे नाहीत माझ्याकडे तुम्हाला परतदयायला.
ग्राहकः बरं, सुट्टे देतो. हे घ्या काका ४० रुपये.please mark me as a Brainlist