फळ्याचे आत्मवृत्त निबंध
Answers
फळाचे आत्मवृत्त
मी फळांचा राजा बोलतोय!
होय, बरोबर ओळखलंत, मी आंबा बोलतोय.
गर्मी अली आहे, आणि मला ठाऊक आहे की तुम्ही माझी आतुरतेने वाट पाहत असाल. गेल्या वर्षीच्या अवेळी पावसामुळे मी कमी प्रमाणात तुमच्यापर्यंत पोहचलो होतो. पण ह्या वर्षी भरपूर मोहर लागला आहे. कैऱ्या सुद्धा जास्त प्रमाणात तयार होत आहेत. आमची आमराई बहरलेली आहे. माळी बाबा पण खुश आहेत.
मे महिना येई पर्यंत मी तयार होईन आणि तुमचा पर्यंत येईन. ह्या वर्षी परदेशी जाण्याचा योग आला तर भाग्याचं उजळेल!
भेटू लवकरच!
■■ फळ्याचे आत्मवृत्त■■
नमस्कार मुलांनो, मी तुमचा मित्र 'फळा' बोलत आहे. शाळेला आज सुट्टी आहे, म्हणून मला आराम मिळाले आहे. विचार केले तुमच्याशी थोडे बोलावे.
मी एका कारखान्यात जन्म घेतले होते. माझे रंग काळे व माझ्या चारही भोवती लाकडाची बॉर्डर होती. माझ्या बऱ्याच मित्रांचा रंग काळाच होता. काहींचा रंग हिरवा होता, तर काही मेणकापडाचे बनले होते. एक दिवशी आम्हाला एका शाळेत आणले गेले.
तिथे दहावीच्या वर्गात मला स्थान मिळाले. वर्गातील मुले मला स्वच्छ ठेवायची. रोज माझ्यावर तारीख, सुभाषित लिहायची. कधीकधी बाजूने नक्षी काढायची. मी तेव्हा सुंदर दिसायचो.
मी त्यांची खूप मदत केली. त्यांना कठीण शब्दांचे अर्थ, गणित, विज्ञान, इंग्रजी, इतिहासाबद्दल माहिती माझ्यामुळे चांगल्या प्रकारे समझली.
पण, त्यांच्यातील काही मुले वाईट आहेत. ते माझ्यावर काहीबाही लिहितात, वेडीवाकडी चित्रे काढतात. तेव्हा, मी खूप वाईट दिसतो. मला दुःख होते. असे करू नका. मी तुमचा मित्र आहे.
चला. आता परत भेटू.