Geography, asked by utsav8236, 1 year ago

फरक स्पष्ट करा: भूकंप व ज्वालामुखी

Answers

Answered by gadakhsanket
151
★उत्तर - भूकंप व ज्वालामुखी यातील फरक अनुक्रमे खालीलप्रमाणे.

भुकंप

१) भूपृष्ठाच्या अंतर्भागात होणाऱ्या हालचालींमुळे भुकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो. व तेथे उर्जालहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावते, यालाच भूकंप म्हणतात.
२) भूकंपामुळे इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते.
३) काही वेळा भूकंपामुळे भूजलाचे मार्ग बदलतात. उदाहरणार्थ, विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात.

ज्वालामुखी

१) पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय.
२) ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते. किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते.
३) मृत ज्वालमुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात.

धन्यवाद....
Answered by thesparkclasses21
5

Explanation:

search on brainly

Similar questions