Geography, asked by rohinirikame1128, 1 month ago

फरक स्पष्ट करा भरती व ओहोटी​

Answers

Answered by parthsonawane2002
6

Answer:

चंद्र व सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणांमांमुळे पृथ्वीवरील महासागरासाऱख्या मोठ्या जलसंचयांतील पाण्याच्या पातळीत आवर्ती (ठराविक कालांतराने पुनःपुन्हा होणारे) चढउतार होतात, यांस भरती-ओहोटी असे म्हणतात. सर्व पृथ्वीचा विचार करता रोज दोन भरत्या होतात.

एक चंद्रासमोर येणाऱ्या पृथ्वीच्या भागावर व दुसरी चंद्राच्या विरुद्ध बाजूस असलेल्या पृथ्वीच्या भागावर. भरतीमागून ओहोटी व तीनंतर पुन्हा भरती येण्याचे चक्र असून त्याचा आवर्तन काल सामान्यपणे २४ ता. ५० मि. या चांद्र दिवसाच्या कालवधीशी निगडित आहे. जलसंचयाच्या विस्ताराच्या मानानुसार गुरुत्वाकर्षणाच्या परिणामात फरक आढळतो. त्यामुळे तळयासारख्या जलसंचयाच्या पातळीत होणारे फरक अगदीच अल्प असतात. गुरुत्वाकर्षणाचे परिणाम पाण्याप्रमाणे पृथ्वीच्या घनपृष्ठावर (शिलावरणावर) व त्यावरील वातावरणावरही होतात.

पृथ्वीच्या बहुतेक भागांत दिवसाकाठी दोन वेळा भरती व दोन वेळा ओहोटी येते. ही गोष्ट समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांच्या नेहमीच पाहण्यात येते. एका भरतीनंतर दुसरी भरती सरासरी १२ ता. २५ मि.नी येते. असाच प्रकार ओहोटीच्या बाबतीतही घडत असतो. प्रत्येक दिवसाच्या भरतीच्या मानात म्हणजे फुगवट्याच्या उंचीत फरक पडत असतात. अमावस्येला किंवा पौर्णिमेला येणारी भरती ही शुक्ल किंवा कृष्ण पक्षातील अष्टमीला येणाऱ्या भरतीपेक्षा मोठी असते. समुद्राच्या खोलीनुसारही निरनिऱाळ्या ठिकाणच्या भरत्यांत स्थानिक भेद आढळतात.

भरतीचे साधारण तीन प्रकार आहेत : अर्ध-दैनिक, दैनिक व संमिश्र, अर्ध-दैनिक प्रकारात दररोज दोनदा भरती व दोनदा ओहोटी येते आणि दोन्ही भरत्या किंवा ओहोट्या साधारणमानाने सारख्याच उंचीच्या असतात. दैनिक प्रकारात दररोज एक भरती व एक ओहोटी असते. (उदा., फ्लॉरिडाचा पेन्साकोला भाग) संमिश्र प्रकारात अर्ध-दैनिक व दैनिक हे दोन्ही प्रकार महत्त्वाचे असून दोन भरत्यांची उंची काही दिवस वगळता साऱखी नसते. अटलांटिक महासागरवरील भरती सर्वसाधारणपणे अर्ध-दैनिक व पॅसिफिक महासागरातील भरती संमिश्र प्रकारची असते.

भरतीच्या वेळची पाण्याच्या पातळीची उंची व ओहोटीच्या वेळची पातळीची उंची यांतील फरकास 'भरतीची अभिसीमा' असे म्हणतात. अमावस्या व पौर्णिमा यावेळी अभिसीमा कमाल असून त्यानंतर ती कमीकमी होत जाऊन अष्टमीला किमान होते. साधारणपणे चंद्रोदयाच्या सुमारास भरतीला सुरुवात होऊन सु. ६ तासांनंतर भरती अंतिम मर्यादा गाठते. या मर्यादेस 'समा' असे म्हणतात. समा अवस्था १०-१२ मिनिटे टिकते. ओहोटीच्या वेळेच्या किमान मर्यादेस 'निखार' म्हणतात. सागराची सरासरीची पातळी व पूर्ण भरतीच्या वेळेची पातळी यांतील फरकाला भरतीची 'उंची' किंवा 'चढ' म्हणतात. भरतीची कमाल पातळी ज्या त्वरेने वाढते, त्याच त्वरेने ओहोटीच्या वेळची किमान पातळी सामान्यपणे उतरत नाही.

सूर्यामुळे येणारी भरती अधिक मोठी असणारी स्थाने जगात फारच थोडी आहेत. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनाऱ्यावरील ॲडिलेड बंदर हे त्यांपैकी एक आहे. तेथे एका भरतीनंतर दुसरी भरती सु. १२ तासांनी येते.

भरती-ओहोटी या एकापोठोपाठ घडणाऱ्या घटना असून त्या चंद्र, सूर्य इत्यादिकांची स्थाने, पाण्याची खोली, तापमान, घनता व वातावरणातील क्षोभ यांवर प्रामुख्याने अवलंबून असतात. त्यामुळे पाण्याची उच्च पातळी व नीच पातळी होणे या क्रिया भरती-ओहोटीशी संबंधित असल्या, तरी समकालीन म्हणजे एकाच वेळी घडणाऱ्या घटना नाहीत.

Explanation:

hope it helps you

Similar questions