फरक स्पष्ट करा.- वहन आणि अभिसरण
Answers
Answer:
संपर्कात असलेल्या वस्तू दरम्यान ऊर्जा हस्तांतरण होत असते. औष्णिक चालकता ही उष्णता आयोजित करण्यासाठी सामग्रीची मालमत्ता आहे आणि प्रामुख्याने उष्णता वाहकतेसाठी फूरियरच्या कायद्यानुसार मूल्यांकन केले जाते
Answer:
उष्णतेचे वहन आणि अभिसरण हे दोन गुणधर्म आहेत. उष्णतेचे वहन म्हणजे उष्णता एका वस्तूतून दुसऱ्या वस्तुत जाणे.
समजा जर आपण एका गरम पाण्याच्या भांड्यात एखादी लोखंडाची वस्तू ठेवली तर ती लोखंडाची वस्तू सुद्धा गरम होऊन जाते. याचा अर्थ असा होतो की गरम पाण्यातून लोखंडी वस्तू उष्णतेचे वहन झाले.
उष्णतेचे वहन हे पदार्थाच्या द्रव वायू स्थायू कुठल्याही अवस्थेतून कुठल्याही अवस्थेत होऊ शकते.
उष्णतेचे अभिसरण फक्त द्रव आणि वायू माध्यमातच होते. पाणी गरम करत असताना भांड्याच्या खाली असलेले पाणी लवकर गरम होते व त्याची घनता होऊन ते वरती जाते आणि वरील थंड पाणी खाली येते या प्रक्रियेला उष्णतेचे अभिसरण असे म्हणतात.