फरकस्पष्ट करा.
(अ) मध्यम उदयोग - अवजड उद्योग
(आ) कृषीपूरक उदयोग - माहिती तंत्रज्ञान उद्योग
Answers
Answer:
मराठवाडा विभागात कृषीपूरक उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी मोठा वाव आहे. युवक मंडळींनी यातील संधी शोधून रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घेतल्यास त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आश्वासन यांनी दिले.
लातूर तालुक्यातील रायवाडी येथे संगमेश्वर बोमणे यांच्या पुढाकारातून उभारलेला श्रीशैल्य हायटेक नर्सरीचा शुभारंभ पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू अशोक ढवण, नॅचरल शुगर इंडस्ट्री रांजनीचे चेअरमन कृषिरत्न बी.बी.ठोंबरे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव आदी उपस्थित होते.
श्रीशैल्य हायटेक नर्सरीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना अमित विलासराव देशमुख म्हणाले की, एखाद्या व्यक्तीने ठरविल्यानंतर काय करू शकतो हे संगमेश्वर बोमने यांच्या कार्याकडे पाहिल्यानंतर समजते. त्यांनी अल्प काळात एक गरुडझेप घेतली आहे ती दृष्ट लागण्यासारखी आहे. केवळ पैसा कमावणे हे उद्दिष्ट न राहता प्रमाणिकपणे कार्य केले तर यातून पैसा, प्रसिध्दी आणि समाधानही मिळते. बोमणे यांच्या सारखे कार्य मराठवाडयातील असंख्य युवकांनी हाती घेणे गरजेचे आहे.
मराठवाडयात आता सोयाबीन हे प्रमुख पिक असून त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी विदयापीठाने सातत्याने संशोधन करणे गरजेचे आहे असे सांगून सिंचनाच्या बाबतीत ही आधुनीक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्यादृष्टीहने शेतकऱ्यांमध्ये जागृती आणण्यासाठी कुलगुरू डॉ. अशोक ढवण विशेष लक्ष देतील असेही त्यांनी म्हटले आहे. ऊसशेतीसाठी अधिकचे पाणी लागते हा गैरसमज असल्याचे नॅचरल शुगरचे चेअरमन बी.बी.ठोबरे यांनी आपल्या भाषणात म्हटले होते तो धागा पकडून इस्त्राएलच्या धर्तीवर उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन लातूर जिल्हयात व्हावे यादृष्टीने कृषी विभाग, साखर कारखाने व विदयापीठ यांनी एकत्रीत काम करणे अपेक्षित असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितले. ज्या उत्पादनाला अधिक भाव मिळतो ते उत्पादन शेतकरी घेतात त्यामूळे त्यांना ऊस हे पिक घेऊ नका असे संगता येत नाही त्यामूळे पाण्याचा वापर कमी होईल आणि उत्पादनही अधिक वाढेल असे पर्याय शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. श्रीशैल्य नर्सरीमध्ये दर्जेदार ऊसाची रोपे तयार होत आहेत अशा अनेक नर्सरी जिल्हयात तयार व्हावीत येथे तयार होणारी ऊसाची रोपे कमी पाण्यात तग धरावी अधिक साखर ऊतारा देणारी ती ठरावीत आणि कमी खर्चात शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळावे यादृष्टीनेही संशोधन व्हावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. सर्व क्षेत्रात लातूरला पूढे घेऊन जाण्यासाठी आदरणीय नेते विलासराव देशमुख यांनी एक दिशा निर्माण करून दिली आहे. त्या दिशेने वेगवान वाटचाल करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादही त्यांनी यावेळी केले.
कृषीपूरक उदयोग उभारणीसाठी मोठा वाव असून त्यादृष्टीने शासकीयस्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे त्यासाठी आवश्यक असणारे शिक्षण आणि प्रशिक्षण व्यवस्था उभारणे गरजेचे असल्याचे सांगून विदयापीठस्तरावर तसे काम सुरू असल्याचे कुलगूरू डॉ.अशोक ढवण यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार वैजनाथराव शिंदे, नॅचरल शुगर इंडस्ट्री रांजनीचे चेअरमन कृषिरत्न बी.बी.ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी श्रीशैल्य हायटेक नर्सरी उद्घाटप्रसंगी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास डॉ. रमेश भराटे, डॉ. अभय कदम, महालींगप्पा बोमने, समद पटेल, सुपर्ण जगताप, राम बोरगावकर, तुकाराम पाटील, प्रवीण सुर्यवंशी, प्रेम पाटील, गोविंद सारगे, व्यंकटेश सुर्यवंशी यांच्यासह सामाजिक, क्रीडा, कृषी, राजकीय, शिक्षण, क्षेत्रातील मान्यवर, रायवाडी ग्रामस्थ, ऊसउत्पादक शेतकरी तसेच बोमने कुटुंबीय व मित्र परिवार यांची उपस्थिती होती.
प्रारंभी देशमुख यांनी श्रीशैल्य ऊसरोप हायटेक नर्सरीची पाहणी करून मांगल्याचा जलकलश तुळशी वृंदावनी अर्पण करून या कार्यक्रमाची आगळी वेगळी सुरुवात केली. या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या कडून शुभेच्छा संदेश पाठविण्यात आला होता. तसेच या नर्सरीसाठी सहकार्य करणाऱ्या मान्यवरांना ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगमेश्वर बोमने यांनी केले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचलन अब्दुल गालिब शेख यांनी तर सुधाकर सरवदे यांनी आभार मानले.