Farewell speech in Marathi for senior on his transfer
Answers
■■वरिष्ठ कर्मचाऱ्याच्या निरोप समारंभासाठी भाषण■■
इथे उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे मनापासून स्वागत.आज आपण इथे आपल्या कंपनीमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून काम करत असलेल्या वरिष्ठ कर्मचारी रमेश सिंह यांच्या निरोप समारंभासाठी एकत्रित झालो आहोत.मी रमेश सिंह सरांबद्दल थोडं बोलू इच्छितो.
आम्हाला वाईट वाटत आहे की तुम्ही आपली कंपनी सोडून जात आहात. तुमच्यासोबत आम्ही पंधरा वर्षे काम केले आहे.या काळावधीत तुमच्यकडून आम्हाला खूप काही शिकता आले.
तुमच्या मार्गदर्शनाने आम्हाला व आपल्या कंपनीला खूप यश मिळाले आहे.तुमच्या वेगळ्या व नवनवीन योजनांनी आपल्या कंपनीला खूप फायदा झाला आहे.
आम्हा सगळ्यांना तुमचा खूप अभिमान वाटतो.तुमच्यकडून आम्हाला सगळ्यांनाच खूप प्रेरणा मिळाली आहे.
आम्ही सगळे हीच आशा करतो की तुम्हाला तुमच्या करियर मध्ये यश मिळत राहो.तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा.
धन्यवाद!