फटाके मुक्त दिवाळी निबंध मराठी
Answers
Answer:
hope it will help
Explanation:
फटाकेमुक्त दिवाळी
दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.
फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!
Answer:
फटाक्यांशिवाय दिवाळीमुळे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण टाळता येईल. फटाक्यांच्या बेजबाबदार वापरामुळे रस्त्यांवरून चालणार्या लोकांना त्यांचे डोळे गमवावे लागल्याच्या बातम्या आपण ऐकल्या आहेत किंवा आल्या आहेत. फटाके फोडल्याने निर्माण होणाऱ्या प्रचंड ध्वनी प्रदूषणामुळे लहान मुले आणि वृद्धांना त्रास होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. फटाके फोडल्यामुळे वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे दम्यासारख्या श्वसनाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या बातम्या आमच्याकडे आल्या आहेत. मात्र, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणाचा दोष केवळ दिवाळीत फटाके फोडण्यावर लावणे योग्य नाही. जेव्हा धोरणकर्ते वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणाचा सामना करण्याचा विचार करतात, तेव्हा प्रदूषणाच्या स्त्रोतांच्या दृष्टीकोनातून विचार करणे महत्त्वाचे आहे, केवळ एक-दोन दिवसांपेक्षा जास्त वर्षभर. दिवाळीत फटाके न फोडता, मित्र आणि कुटुंबीयांना भेटून, घरच्या घरी बनवलेल्या पदार्थांचे वाटप करून खूप मजा करता येते. फटाके नसले तरीही आपली घरे सजवणे, आपल्या प्रियजनांना भेटवस्तू देणे, प्रार्थनास्थळांना भेट देणे या दिवाळी साजरी करण्याचे काही मनोरंजक मार्ग आहेत.
Explanation:
- ऐतिहासिकदृष्ट्या, वाईटावर चांगल्याचा विजय आणि रावणाचा पराभव केल्यानंतर आणि 14 वर्षांचा वनवास कालावधी पूर्ण केल्यानंतर प्रभू राम अयोध्येत परतले हे पाहण्यासाठी दिवाळी साजरी केली जाते.
- या प्रसंगी, अयोध्येतील ग्रामस्थांनी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी भगवान रामाचा मार्ग डायससह उजळला.
- तथापि, आधुनिक काळात, लोकांनी लंकेचा राजा रावणावर भगवान रामाचा विजय साजरा करण्यासाठी फटाके फोडले.
- फटाके फोडून प्रभू रामाच्या परतल्यावर उत्साह आणि आनंद दाखवण्याचा हा एक मार्ग आहे. दिवाळीत आपण फटाके का फोडतो, याचे काही निश्चित कारण नाही
- दिये वापरण्याचा हा एक उत्तम भाग आहे ते विजेची बचत करतात तसेच तुमच्या घराचे सौंदर्य वाढवतात. याव्यतिरिक्त, ते पुन्हा वापरण्यायोग्य, बायोडिग्रेडेबल तसेच किफायतशीर आहेत.
- विविध प्रकारच्या रंगीबेरंगी आणि फॅन्सी पारंपारिक डायसाठी निवडा. अधिक मजा जोडण्यासाठी, तुम्ही त्यांना DIY पेंट करू शकता किंवा फॅन्सी रिबन्स चिकटवू शकता.