Hindi, asked by what3226, 1 year ago

fatkay pustkachi aatm Katha in Marathi

Answers

Answered by nany39
0

aatm

katha

in

marathi

ke ilava kuch smj nhi a rha....hindi me likhdete....

Answered by xXxALPHAxXx
1

Answer:

Explanation:एक मोठ ग्रंथालय होत , तिथे अनेक लाखो पुस्तक होती, आणि त्यात मी मराठी पुस्तक ,अशी बरीच पुस्तक मराठीची होती त्या ग्रंथालयमध्ये पुस्तक वाचण्यासाठी बरीच मोठी जागा दिली होती . बरीच मुल माणसं आपल्या भाषेची व आवड़ी नावड़ी ची पुस्तके वाचत बसली होती . एक मुलगा आला , साध शर्ट – पैंट, पायात चपला , केसांचा एका बाजूला भांग विंचारलेला, तो मुलगा ग्रंथालयातल्या माणसाशी काहीतरी गुणगुणु लागला होता, मला खूप आनंद झाला कारण तो मुलगा त्या ग्रंथालयातल्या माणसाशी मराठी भाषेत बोलला मी मनात म्हणालों, म्हणजे हा मुलगा मराठीच आहे तो पुस्तक शोधन्यास लागला होता मी त्याला मोठ्या मोठ्याने हाका मारत होतो “अरे . . . . ये . . . . . बालका इकडे ये . . . . .

त्याने काही ऐकलीच नाही, आजूबाजूची पुस्तके मला खूप हसू लागली होती. तो मुलगा पुस्तक शोधत शोधत माझ्या जवळ येत होता अचानक त्याने चालण थांबवलं आणि एक पुस्तक काढलं, पण ते पुस्तकं पाहून माझं मन एकदम उदास झालं होत, कारण ते मराठी भाषेच पुस्तकं नसून ते दुसऱ्या भाषेचं पुस्तक होतं. चार वर्ष झाली मला कोणीच जवळ घेत नहूत . एका जागेत बसून माझ्या अवयवाचे तुकडे पडले होते त्या जागेत राहून माझा ‘श्वास’ अगदी कोंडला होता . माझ्या डोळ्यातुन पाणी येऊ लागलं होत पण ते दुसऱ्यांना कसं दिसणारं. अशाचवेळी एका बलवान मुलाने प्रवेश केला.अंगाने एकदम टापटीप,दोन्ही कानात रुद्राक्ष बाल्या ,कपाळाला भगवा टिळा, गळ्यात जाड रुद्राक्षाची माळ, तो ग्रंथालयात येताच मी डोळे पुसले. मी त्या मुलाला म्हणालो,

” ये रे ….ये…. माझ्या लेका.. ये.. मी तुझीच वाट बघत होतो अरे मला इकडून घेऊन जा रे खूप कंटाळा आला आहे रे मला इथे राहून…..”

‘तो मुलगा पुस्तकं शोधण्यास गुंग होता त्याला एक पुस्तकं दिसलं पण ते पुस्तकं खूप खालच्या थराला होतं म्हणून तो मुलगा ‘जय शिवराय’ बोलून तो खाली बसला ….। त्याने एक पुस्तकं काढलं पण त्याला ते आवडलं नाही, म्हणून त्याने आहे त्याच ठिकाणी ते पुस्तकं ठेवलं मी मनात म्हणालो “जय शिवराय म्हणजे ह्याला मराठी पुस्तकं हवं आहे” मी त्याला जोऱ्या जोऱ्यात हाका मारल्या पण त्याने काही लक्ष्य दिलं नाही तो मूलगा तिथून मागे फिरला बहुतेक त्याचा मुड ऑफ झाला असावा, त्याला हवं ते पुस्तक मिळालं नसेल म्हणून तो मागे फिरला तितक्यात मला एक युक्ती सुचली मी जर ह्या कपाटावरून उडी मारली तर ? मोठा आवाज येईल,पण माझे अवयव वेगवेगळे होतील …..माझे अवयव वेगळे झाले तरी चालतील पण माझा ‘मराठी’ ।

माणूस वेगळा होता कामा नये,मी जास्त विचार न करता कापाटावरून उडी मारली ‘धप्पपsssss ‘ असा आवाज आला , माझे अवयव पूर्णपणे वेगवेगळे झाले.त्या मुलाला धाप्प असा आवाज कानी पडताच तो जागच्या जागी थांबला आणि मागे वळून पाहिलं तो मागे फटाफट आपले पाऊल टाकत टाकत माझ्याकडे आला तो खाली बसला जय शिवराय जय शिवराय हे नामस्मरण त्याचा तोंडात चालूच होतं, त्याने मला उचलून घेतलं माझी वेगळी झालेली अवयव त्याने व्यवस्थित जोडले आणि मला बंद केलं. त्याच लक्ष पाहिलं माझ्या अवयवाकडे गेलं त्याचे डोळे मोठे झाले तितक्यात त्याने जोरात हाक मारली राजे……….. कारण माझ्या पहिल्या अवयवावर शिवाजी महाराज अस लिहलं होत त्या मुलाने ‘राजे राजे ‘ म्हणत म्हणत त्याने मला मस्तकाला लावलं सगळी पुस्तक माणसे मुले हि आमच्याकडे बघत होती त्याने मला मस्तकावरून काढताच तो मला वाचत बसला मला खुप आनंद होत होता, कारण मी त्याच्या अगदी जवळ होतो तो पुस्तक वाचता वाचता त्याने अचानक मला बंद केलं आणि त्या ग्रंथालयातल्या माणसाकडे गेला त्यांना तो म्हणाला “सर हे पुस्तक मला घरी घेऊन जायचं आहे तर मला हे पुस्तक मिळाले का” ? ते मला म्हणाले “होय मिळेल फक्त चार दिवस….., प्रथम नाव घरचा पता सांग”त्या मुलाने पत्ता सांगितला तो मला हातात उचलून घेऊन निघून गेला मी सर्व पुस्तकांना राम- राम केलं,

“ ह …….. हा पण बहुतेक अर्धवट वाचणार ? पण नाही ……. तुझ्या वाचण्यात सकाळ उलठुन गेली सकाळची दुपार झाली अरे दुपारची रात्र झाली पाणी न पिता कंटाळा न करता भूक लागली असून त्यावर नियंत्रण ठेवता तूम्ही मला पूर्ण वाचलात पहिलाच मुलगा आहेस की त्याने मला पूर्ण वाचल त्यामुळे माझ्याकडून तुम्हांला मानाचा मुजरा

Similar questions