World Languages, asked by jyotizeus, 9 months ago

five sentences on cricket in marathi

Answers

Answered by nsanitha007
0

brainlist plz

क्रिकेट हा मैदानावर प्रत्येकी ११ खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान, चेंडू(बाॅल) आणि फळी (बॅट) ने खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानाच्या मध्यभागी एक २२-यार्ड लांबीची मुख्य खेळपट्टी असते. तिच्या दोन्ही टोकांना प्रत्येकी ३ लाकडी यष्टी असतात. एक संघ फलंदाजी संघ म्हणून खेळतो. हा संघ जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ क्षेत्ररक्षण करतो. खेळाच्या प्रत्येक टप्प्याला डाव असे म्हणतात. संघाचे दहा फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा निर्धारित षटके पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघ आपापली भूमिका बदलतात. एका किंवा दोन डावांत अतिरिक्त धावा मिळून ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल तो विजेता संघ म्हणून घोषित होतो.

प्रत्येक सामन्याच्या सुरुवातीला, दोन फलंदाज आणि अकरा क्षेत्ररक्षक खेळाच्या मैदानात उतरतात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील गोलंदाज खेळपट्टीच्या एका टोकापासून, दुसऱ्या टोकाला असलेल्या फलंदाजाकडे (या फलंदाजाला स्ट्रायकर म्हणतात.) जेव्हा चेंडू फेकतो, तेव्हा खेळाला सुरुरवात होते. स्ट्रायकर खेळपट्टीवर यष्टीसमोर चार फुटांवर क्रीजमध्ये उभा राहतो. बॅटचा वापर करून चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापूर्वी अडवणे आणि धावा करता येण्याइतपत टोलवणे ही फलंदाजाची भूमिका असते. दुसरा फलंदाज (नॉन-स्ट्रायकर), खेळपट्टीच्या दुसऱ्या टोकाला गोलंदाजाजवळ क्रीजच्या आतमध्ये उभा राहतो. बाद झालेल्या फलंदाजाला मैदान सोडावे लागते, आणि त्याच्या संघातील दुसरा खेळाडू त्याची जागा घेतो. फलंदाजाला धावा करू न देणे आणि त्याला बाद करणे ही गोलंदाजाची उद्दिष्ट्ये असतात. एकाच गोलंदाजाने एका मागोमाग एक सहा वेळा चेंडूफेक केल्यानंतर चेंडूफेकीचे एक षटक पूर्ण होते. त्यानंतरचे षटक दुसरा गोलंदाज, खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूने टाकतो.

Answered by kavya200519
1

Answer:

it is an option to you you can write any one of the photo I am following you so please mark my answer as brainliest

Attachments:
Similar questions