From the 1st and 2nd image take reference and answer the 3rd and 4th image plzzzzzzzzzz by 9th July
But a 6 to 8 lines answer
Attachments:
Answers
Answered by
1
पाऊस पडल्यानंतर निसर्गात कोणते बदल होतात असे कवी म्हणतो?
उत्तर – पाऊस पडल्यानंतर पृथ्वीवर जिकडे-तिकडे पाणीच पाणी दिसायला लागते. रानवनातून रानझरे खळखळत वाहतात. रानवनात पोपटी रंगाचे गवत वा-यामुळे मंदपणे झुरझुरतात. त्यामुळे गवतावर असलेले तुरे खाली लवत असतात.
पाऊस पडल्यामुळे झाडांना नवी चमक येते. वृक्ष-वेलीवरची पान-फुले स्नान करतात. पक्षी देखील पावसात भिजल्यानंतर स्वच्छंद विहार करतात. डोंगर देखील पावसात भिजुन आनंद घेत आहेत. आणि डोंगरावरून झरे उड्या घेत-घेत खाली येत आहेत.
निसर्ग हा माणसाचा खरा गुरू आहे या विषयावर तुमचे विचार लिहा.
उत्तर - माणसाचं व निसर्गाचं अतूट नाते आहे. निसर्गापासून आपणास किती काही शिकायला मिळते आणि म्हणूनच निसर्ग हा माणसाचा खरा गुरु आहे. निसर्गाच्या सोबतीत आपणास शिकायला मिळते की जशी फूल काट्यात बहरतात तस आपणही प्रत्येक संकटात हसत राहवे. झाडांप्रमाणे खंबीर उभ राहून नेहमी दुस-यांना मदत करणे. नदी जशी कितीही अडथळे आली तरी सतत वाहतच असते तसच आपणही सर्व कष्टानां न घाबरता सामोरे जाणे. आणखी बरच काही हा निसर्ग आपणास शिकवतो. मग तोच नाही का आपला खरा गुरु.Similar questions