Hindi, asked by sia133, 9 months ago

funfair i seen essay in marathi​

Answers

Answered by sunitadubeydi
0

Answer:

First Mark me as brain list

Explanation:

Then the i give your answer

Answered by Hansika4871
2

मी पाहिलेली जत्रा

मी पाहिलेली जत्राMe pahileli funfair essay

दहावीच्या परीक्षा जवळ येत असल्याकारणाने आमचा अभ्यास जोर पकडत होता. पण रोज अभ्यास करून करून आम्हाला विरंगुळ्यासाठी कुठेतरी फिरायला जायची चटक लागली होती. एके संध्याकाळी मी आणि राजूने गिरगाव चौपाटी ला भेट देण्याचा निर्णय घेतला.

प्रवास करून आम्ही चरणी रोड स्थानकावर पोचलो, अवघे १५ मिनटे चाललो आणि आम्ही चौपाटी वर पोचलो.

कारण तिकडे "रांबो जत्रा" होती.

मी तशी बर्‍याच वेळा चौपाटी ला भेट दिली होती, पण या वेळी ते दृश्य जरा वेगळेच होते. संध्याकाळचे सहा वाजले होते व सूर्य मावळण्याच्या अवस्थेत होता. आकाश नारंगी रंगाचे झाले होते, आणि पक्षी आपल्या घरी परतत होते. साडेसहा वाजता सूर्य मुंबईचा मोठ्याला बिल्डींग मागे मावळला. चौपाटीवर जत्रेसाठी गर्दी वाढू लागली होती, तिकडे वाळूपासून किल्ला बनवा अशी स्पर्धा होती: लहान मुले वाळूमध्ये त्यांचे गड किल्ले बनवत होते. आम्ही देखील लहान होऊन त्या मुलांना मदत करायला गेलो व आमचा गड आम्ही बनवला. विविध प्रकारचे खेळणी विकणारे, फुगे फुगवणे करणारे तसेच कापसाचे गोळे बर्फाचे गोळे अशा विक्रेत्यांची गर्दी देखील होती.

आम्ही मोठ्या झुल्यावर बसलो, बापरे वरती गेल्यावर जी भीती वाटली पण खूप मजा आली. थोड्यावेळाने शतपावली केल्यानंतर आम्हाला भूक लागली व आम्ही चाट खायला गेलो. पंचवीस ते तीस प्रकारची चारची दुकान होती, पाणीपुरी शेवपुरी खाल्ल्यानंतर आम्ही फालुदा वर ताव मारला. बऱ्याच आठवणी आमच्या मनात साठवून आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला. दोघांपैकी कोणालाच घरी जावेसे वाटत नव्हते. एकूण ही जत्रा खूप नयनरम्य होती.

Similar questions