India Languages, asked by Harshiie840, 11 months ago

गाढव - मीठ -नदी -कापूस story in marathi

Answers

Answered by shinchan8796
159

तुकाराम नावाचा एक ‍मीठाचा व्यापारी होता. त्याच्याजवळ एक गाढव होते. ते फार आळशी होते. रोज सकाळी तुकाराम गाढवाच्या पाठीवर मीठाच्या पिशव्या लादत असे. 

मग तो गाढवाला घेऊन शेजारच्या गावात मीठ विकायला जात असे. जाताना एक ओढा लागत असे. एके दिवशी ओढा ओलांडत असताना गाढवाचा पाय अचानक घसरला व ते पाण्यात पडले. त्यामुळे त्याच्या पाठीवरचे मीठाचे पोते पाण्यात भिजले. 

त्यातील मीठ विरघळल्याने ते हलके झाले. त्यामुळे गाढवाचे ओझे कमी झाले. त्याला चांगलाच आराम मिळाला. दुसर्‍या दिवशी गाढवाने मुद्दाम पाण्यात पडल्याचे नाटक केले. मीठ पुन्हा पाण्यात भिजल्याने त्यादिवशीही गाढवाला आराम मिळाला. 

मग तो सारखेच असे करू लागला. पण लवकरच तुकारामला ही युक्ती लक्षात आली. त्याची खोड मोडण्यासाठी मग त्याने एके दिवशी त्याच्या पाठीवर कापसाचे ओझे ठेवले. 

ओढा लागताच गाढवाने पुन्हा पडल्याचे नाटक केले. मात्र, या वेळी पाटीवर मीठाऐवजी कापूस असल्याने तो भिजल्यावर चांगलाच जड झाला. 

त्यामुळे गाढवाला लवकर उठता येईना. त्याला त्या दिवशी अधिकच ओझे वाहावे लागले. त्याला चांगलीच अद्दल घडली. तेव्हापासून गाढवाने कधीच पाण्यात पडल्याचे नाटक केले नाही व कामचुकारपणा केला नाही. 

उपदेश ः कामातून पळवाट शोधणे केव्हाही वाईट

Answered by dualadmire
14

                                            मीठ विक्रेता आणि त्याचा गाढव.

  • एका गावात एक मीठ विक्रेता होता. तो जवळच्या शहरातून मीठ विकत घेत असे. हे मिठाचे ओझे वाहून नेण्यासाठी त्याच्याकडे एक गाढव होते. शहरात पोहोचण्यासाठी अनेक ओढे पार करायचे होते.
  • एके दिवशीं तो विक्रेता आपली खरेदी करून परत येत होता.
  • गाढवावर मिठाच्या पिशव्या भरलेल्या होत्या. ते एक ओढा ओलांडत असताना चुकून गाढव घसरून ओढ्यात पडले. बरेच मीठ पाण्यात विरघळले. गाढव उठल्यावर ओझे एकदम हलके झाले.
  • त्या दिवसापासून जेव्हा जेव्हा तो विक्रेता मिठाची खरेदी करून शहरातून परत येत असे, तेव्हा गाढव एका किंवा दुस-या ओढ्यावरून अर्ध्या वाटेत कोसळू लागे. विक्रेत्याला संशय आला.
  • एकदा विक्रेत्याने कापसाच्या गाठी विकत घेतल्या आणि आपल्या गाढवावर कापसाच्या गाठी चढवल्या. गाढवाला तो भार विलक्षण हलका वाटत होता. त्याने विचार केला "आज, मी कोसळणार आहे आणि हा भार खूप हलका होणार आहे".
  • घरी जाताना नेहमीप्रमाणे गाढव कोसळलं आणि एका प्रवाहात पडलं. पण अरेरे! गाढवाने उठण्याचा प्रयत्न केला असता भाराने गाढवाला खाली खेचले. कापसाने पाणी शोषून घेतले होते आणि जड झाले होते.
  • गाढवाला उठून चालायला लागावे म्हणून विक्रेत्याने जोरदार मारहाण केली. तेव्हापासून ओढे ओलांडताना गाढव कधीही गडगडले नाही.

नैतिक : काम टाळल्याने अधिक काम होते.

Similar questions