गुलाबाच्या फुलाचे विशेष सांगा लिहा
Answers
Answered by
39
Answer:
सुंदर, लांब, टोकदार फूल असलेला 'ला फ्रान्स' हा 'हायब्रिड टी' या गटातील पहिला गुलाब आहे. ह्या गटातील प्रकारांमध्ये काटकपणा असून दीर्घकाळपर्यंत फुले येतात. फुलांचा आकारही मोठा आणि आकर्षक असतो. गुलाबाचा हा गट अद्यापही फार लोकप्रिय आहे.
Answered by
23
Answer:
मोगरा, निशिगंध ही जशी सुगंधी फुले तसाच गुलाब पण ह्या स्वारीचा स्वाब काही औरच असतो. गुलाबासारखे सोपस्कार करून घेणारे झाड मी तर पाहिलेच नाही. गुलाबाला वाटेल ती जागा चालणार नाही, पाणी कमी झाले तरी त्यात्ता सोसणार नाही नि अधिक झाले तरीही सोसणार नाही. त्याला खत वेळच्या वेळी मिळाले पाहिजे, मुळे मोकळी झाली पाहिजेत, हंगाम साधून छाटणी केली पाहिजे, कीड टिपून मारली पाहिजे, एवढे सगळे करावे तेव्हा हे राजेश्री फुलणार. एकदा गुलाब प्रसन्नपणाने फुलू लागला, की केलेले सगळे श्रम मनुष्य विसरून जातो.
Similar questions