गुणसूत्र विभाजन व अर्ध गुणसूत्र विभाजन महत्त्वाचे फरक
Answers
Answer:
please thanks for the answer
please mark as brainliest answer
Explanation:
सूत्री पेशीविभाजन अर्धगुणसूत्री पेशीविभाजन
1. सूत्री पेशी विभाजन गुणसूत्रांची संख्या बदलत नाही. द्विगुणित पेशी द्विगुणितच राहतात. 1. अर्धगुणसूत्री पेशीविभाजनात गुणसूत्रांची संख्या अर्धी होते. द्विगुणित पेशी एकगुणित होतात.
2. एका जनक पेशीपासून दोन जन्य पेशी निर्माण होतात. 2. एका जनक पेशीपासून चार जन्य पेशी निर्माण होतात.
3. सूत्री पेशीविभाजनाच्या केंद्रक विभाजनात पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था अशा एकूण चार पायऱ्या असतात. 3. अर्धगुणसूत्री पेशीविभाजनात भाग I आणि भाग - II अशा दोन प्रमुख पायऱ्या असतात. प्रत्येक भागाच्या पुन्हा पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था अशा एकूण चार पायऱ्या असतात.
4. सूत्री पेशी विभाजनाची पूर्वावस्था जास्त काळाची नसते. 4. अर्धगुणसूत्री पेशीविभाजन पूर्वावस्था जास्त काळाची असते.
5. सूत्री पेशीविभाजनात सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण होत नाही. 5. अर्धगुणसूत्री पेशीविभाजनात सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण होते.
6. या प्रकारचे पेशीविभाजन वाढ आणि विकास यांसाठी आवश्यक असते. 6. या प्रकारचे पेशीविभाजन युग्मके तयार करण्यासाठी आवश्यक असते.
7. सूत्री विभाजन काय पेशी आणि मूल पेशी अशा दोन्हींत होते. 7. अर्धगुणसूत्री विभाजन काय पेशीत होत नाही; केवळ मूल पेशीतच होते.
Answer:
विभाजन व अर्ध गुणसूत्र विभाजन महत्त्वाचे फरक