Hindi, asked by shirsathrohit51, 7 months ago

गुरूचे महत्त्व या विषयावर दहा
ते बारा ओळीत निबंध लिहा.​

Answers

Answered by mymomanddad807
5

Answer:

hope this help you

Explanation:

ज्ञानाची शक्ती शिष्याच्या क्षमतेपेक्षा भिन्न आहे. अशी ही शक्ती तडकाफडकी एकाच झटक्यात शिष्यात आली तर शिष्यासाठी ती घातक ठरू शकते. अशा वेळी गुरूंच्या शक्तीची आश्यकता भासते.

guruमला नेहमीच विचारले जाते की, वेद आणि योगशास्त्रावर आधारित पुस्तके किंवा ग्रंथ वाचून एखादी व्यक्ती आपली आत्मिक प्रगती का नाही करू शकत? आत्मिक प्रगतीसाठी गुरूचीच गरज का असते? लोक नेहमी म्हणतात की, ‘‘मी मला कुठल्याही दुस-या व्यक्तीसमोर झुकणे मान्य नाही’’ अशा या प्रश्नांनी व विचारांनी मला ‘गुरू’बाबत लिहावयास प्रेरित केले आहे.

‘गुरू म्हणजे काय’ हे समजून घेण्यासाठी अशी कल्पना करा की साधक म्हणजे एका थंडगार दगडासारखा आहे आणि परमज्ञान हे उकळत्या जलासमान आहे. हे असे उकळणारे जल आपण थेट एखाद्या थंडगार दगडावर ओतले तर त्या ज्ञानाच्या शक्तीने आणि तापमानाच्या परिवर्तनाने त्या दगडाला भेग पडू शकते किंवा तडा जाऊन तो दगड खंडित होऊ शकतो.

गुरू ती शक्ती आहे जी ज्ञानाला धारण करण्यात सक्षम असते व स्वत:च्या शक्तीने या ज्ञानाच्या तापाला शिष्याच्या स्तरावर आणू शकते.अर्थात थंडगार दगडावर उकळते जल ओतण्याऐवजी, त्या जलाचे तापमान सर्वप्रथम किंचित कमी करून मग थेंब थेंब करून हे जल त्या दगडावर सोडले जाते, जेणेकरून त्या दगडाला तडा न जाता याउलट त्या दगडाचे तापमान हळूहळू वाढू लागते आणि साधकपण त्या गरम जलाप्रमाणे तापू लागतो आणि स्वत: गुरुपदाला जाऊन पोहोचतो.

अर्थात ज्ञानाची शक्ती शिष्याच्या क्षमतेपेक्षा भिन्न आहे. अशी ही शक्ती तडकाफडकी एकाच झटक्यात शिष्यात आली तर शिष्यासाठी ती घातक ठरू शकते. अशा वेळी गुरूंच्या शक्तीची आश्यकता भासते. कारण ती ज्ञानाला धारण करण्यास सक्षम असते. गुरूंची शक्ती हळूहळू या तापाला शिष्याच्या क्षमतेनुसार त्याच्यात संचालित करते व यामुळे शेवटी साधक कोणत्याही हानीशिवाय ज्ञानाच्या या शक्तीला धारण करण्यास सक्षम बनतो.

Similar questions