India Languages, asked by kulkarnitejaswini24, 10 months ago

ग्राहक हाच राजा निबंध मराठी ​

Answers

Answered by radhagupta0980
1

Answer:

सोपी मांडणी, मोठी व्याप्ती व ग्राहकांच्या हिताचे व त्यांचे हक्क व अधिकार यांची सर्वार्थाने जपणूक करणारा असा हा कायदा आहे. व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ लागली, अधिक नफा मिळविण्यासाठी लबाडी करण्यात येऊ लागली; म्हणून या कायद्याची निकड भासली. ग्राहक चळवळीची सुरुवात प्रथम अमेरिकेत १९६२ साली झाली.

Answered by franktheruler
2

ग्राहक हाच राजा निबंध मराठी खाली प्रकारे लिहीला आहे.

या सृष्टित प्रत्येक मनुष्य हा ग्राहक असतो . जगातील ग्राहक हा सगळ्यात मोठा वर्ग आहे. बऱ्याच अडचणी असतात ग्राहकाच्या! वजनात गडबड असते, खोटी लेबले असतात, मालात भेसळ असते . ग्राहकाची फसवणूक अशा पद्धतीने केली जाते.

ग्राहकाला त्यासाठी काही हक्क देण्यात आले आहेत म्हणून तो संघटित, संरक्षित बनू शकतो.

त्यामुळे ग्राहकवर्गासाठी सर्वव्यापी व सर्वलक्षी ग्राहक संरक्षण कायदा' करण्यात आला आहे. ग्राहकांसाठी

हा कायदा मोठे वरदान आहे. अगदी सुलभ आणि सोपा आहे हा कायदा .कोणतेही कलम व त्याचा अर्थ लावण्यासाठी गरज नाही. हा कायदा , मोठी व्याप्ती व सोपी मांडणी,ग्राहकांच्या हिताचे व त्यांचे हक्क व अधिकार यांची सर्वार्थाने जपणूक करणारा आहे.

ग्राहकांची व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक

होऊ लागली, अधिक नफा मिळविण्यासाठी लबाडी

करण्यात आली. त्यामुळे या कायद्याची निकड भासली.

सर्व प्रथम अमेरिकेत १९६२ साली ग्राहक चळवळीची

सुरुवात झाली.

कोणती वस्तू आपण घेतोय , योग्य दरात ती वस्तु घेतोय का? वस्तूचा दर्जा कसा आहे हे सर्व समजण्यासाठी ही माहिती न्यायालयीन स्तरावर न जाता उपलब्ध व्हावी, यासाठी ही ग्राहक चळवळ सुरू झाली.

मोठ्या प्रमाणावर कृत्रिम खव्यातूनही विषबाधा होते .

भेसळ तर अन्नातील सर्रास होत असते.भेसळ तर भाजीपाल्याबाबतही होतेच . कृत्रिम रंग, रसायने यांचा उपयोग , अशा प्रकारे भेसळ केली जाते.

ग्राहकहिताचा विचार न करता, व्यापारी स्वत:च्या फायद्यासाठी लोकांच्या जिवाशी खेळत असतील म्हणून त्यांना धडा शिकविलाच पाहिजे.

म्हणूनच ग्राहकांना कायदा , जागृतीचा आवाज देत आहे. हा कायदा ग्राहकांना सांगत आहे, 'ग्राहकराजा जागा हो.'

#SPJ2

Similar questions