ग्रामीन सहजीवन वैचारिक लेखन
Answers
Explanation:
आमच्या गावीआमचे घर आहे. शेती आहे.तेथे आमचे काका राहतात .आम्ही शहरात राहतो .एकदा काका आमच्याकडे चार दिवसांसाठी आले होते .रात्री आम्ही जेवायला बसलो होतो. गप्पा-टप्पा जोरात चालू होत्या. काका गावच्या गमतीजमती सांगत होते. हास्यविनोद चालू होते. तेवढ्यात अचानक गावाहून फोन आला .काकांच्या घरात घरफोडी झाली होती .तोडफोडीचा आवाज ऐकून शेजार्यांनी धाव घेतली .गावी घरी दूर दूर असतात . त्याचा चोरट्यांनी फायदा घेतला होता. परंतु आरडाओरड करून लोकांनी सर्वांना गोळा केले. चोरांशी झटापट केली. त्यांना चोप दिला आणि पोलिसांकडे सुपूर्द केले .काका धावत-पळत गावी गेले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गावकरी चोरांना भिडले होते . शेजारयांमळे खूप मोठी हानी टळली होती .काकांचा ऊर भरून आला. त्यांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले."अहो,आभार कसले मानतात? आज तुमच्यावर पाळी आली. उद्या आमच्यावरही येऊ शकते. सर्वांनी एकमेकांना मदत केली, तर आपले सगळ्यांचेच भले होईल," लोकांनी काकांना समजावले.
लोकांचे हे म्हणणे खरे होते. ग्रामीण भागात लोकच लोकांचे रक्षण करतात. आमच्या गावी तर दिवसा दार लावतच नाहीत ,तरी कोणाच्याही घरी चोरी होत नाही. मुले तर या घरातून त्या घरात धावत-पळत पकडापकडीचा खेळ खेळत असतात. एखादा पदार्थ वस्तू अचानक अवेळी हवी झाली,तर लोक शेजार्यांकडे हक्काने जातात .घर परतण्यासारखी कामे सहकार्यानेच होतात. सर्वजण एकत्रित पणे एकेकाचे घर परतत जातात. त्यामुळे एका दिवसात एका घराची कौले काढून पुन्हा लावली जातात .कोणाच्याही घरातील धार्मिक कार्याला आवश्यकतेप्रमाणे सर्वजण सहकार्य करतात .आजारपणात हमखास मदत केली जाते. पहिला पाऊस पडतो, त्या वेळी एखाद्या घरातील कर्ता माणूस आजारी पडला तर बाकीचे सर्वजण विचार विनिमय करून त्या माणसाचे शेत नांगरून देतात. अशा वेळी कोणीही कुरकुर करत नाही. कारण अशी वेळ कोणावरही येऊ शकते ,याची जाणीव सर्वांना असते .
मला नेहमी याचेच कुतूहल वाटत राहते की, ग्रामीण भाग हे कसे काय घडते ?मी पाहतो की, तेथे गावातील सर्व माणसे एकमेकांना पूर्णपणे ओळखतात .सर्वांच्या नातेवाईकांसकट सर्व माहिती सगळ्यांना असते .सर्वांना एकमेकांबद्दल जिव्हाळा असतो. एखाद्याने काही खास कर्तबगारी दाखवली, तर गावातल्या सगळ्यांना ती स्वतःची कर्तबगारी वाटते आणि त्यांची छाती अभिमानाने फुगून जाते.
वास्तविक पाहता गावात अनेक बाबींची कमतरता असते.वाहतूक सेवा ,आरोग्य सेवा ,पाणी, वीज, जीवनोपयोगी वस्तू यांचा पुरवठा ; शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी इत्यादी सर्वच बाबतींत उणिवा असतात. त्यामुळे लोक हतबल, काही प्रमाणात निराश झालेले असतात. त्यामुळेच बहुतेक त्यांना एकमेकांच्या सहकार्याची गरज भासते .अडचणीच्या वेळी एकमेकांच्या मदतीला धावून गेले पाहिजे, हे त्यांना मनोमन जाणवलेले आहे. या कारणांनी सगळेजण स्वतःचे जीवन इतरांच्या जीवनाशी जुळवून घेतात.आपले विचार, कल्पना, स्वप्ने, सुखदुःखे ,अडीअडचणी इत्यांदीशी संपूर्ण ग्रामीणजीवन जोडून घेतात .किंबहुना तशी जगण्याची रीतच निर्माण करतात. ग्रामीण सहजीवनाचा हाच मुख्य आधार आहे .
please mark is as brainlist