Sociology, asked by Heerag6997, 1 month ago

ग्रामीण समुदाची वैशिष्टये सांगा आणि त्याच्या समस्या स्पष्ट करा

Answers

Answered by sadhanashinde83990
0

Explanation:

ग्रामीण भाग म्हटलं की आपल्याला आठवतात त्या सुंदर बैलगाड्या, नदी, नाले, विहिरी, सगळीकडेच हिरवेगार असे शेत, चहूकडे हिरवळ, गाई म्हशी असे विविध पाळीव प्राणी आपल्याला गावात पाहायला मिळतात. आपण सर्वचजण अभिमानाने सांगतो की “भारत माझा खेड्यांचा देश आहे.” पण या खेड्यांसाठी आपण काय केले? काहीच नाही.

आजच्या या एकविसाव्या शतकातही आपल्या देशापुढे अनेक समस्या आहेत. आपल्या देशातील खेड्यातील अवस्था ही आजही दयनीय आहे. गावातील कुटुंबच्या कुटुंबे शहरात स्थलांतर करत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे ग्रामीण भागातील अनेक समस्या, जसे की पावसाअभावी शेतीचे नुकसान, पिकाला योग्य तो भाव नाही, रोजगाराच्या संधी नाही, दैनंदिन जीवनातील काही सोयी सुविधा नाहीत त्यामुळे खेड्यातील अनेक कुटुंब शहरात वास्तव्यासाठी येतात.

‘खेड्यांकडे चला’ असा संदेश दिला होता. त्यावेळी काही ध्येयनिष्ठ तरुण खेड्यांकडे वळलेही; पण स्वातंत्र्यानंतरची पन्नास वर्षे उलटून गेल्यावर भारतीय खेड्यांचे रूप कसे आहे? दिवसेंदिवस खेड्यांकडून शहरांकडे माणसांचा ओघ वाढत चालला आहे. शहरे लोकसंख्येने अवास्तव विस्तारत आहेत आणि खेडी ओस पडत आहेत. ती अधिकाधिक दरिद्री बनत चालली आहेत. असे का? अशा कोणत्या समस्या आहेत ग्रामीण जीवनाच्या?

आज शहरांत भयंकर गर्दी, जागेचा- पाण्याचा तुटवडा, प्रदूषणाची भेसूर समस्या, अपघात, हिंसा यांची सततची टांगती तलवार… असे असतानाही लोकांचे लोंढे खेड्यांकडून शहरांकडे का वळतात? चटकन उत्तर मिळते – ‘पोटासाठी’. ज्याचे गावात शेत नाही किंवा मळा नाही त्याला गावात रोजगार नाही, ही ग्रामीण भागातील सर्वांत मोठी समस्या आहे. पूर्वीची बलुतेदारी नष्ट झाली, पण त्याला पर्यायी उद्योग उभे राहिले नाहीत. एखाद्या छोट्याशा शेतकऱ्याने कष्टाने एखादे पीक काढले तर त्याला गावात योग्य तो भाव मिळत नाही. मग त्याला पडेल त्या भावाने तो माल विकावा लागतो किंवा एखाद्या दलालामार्फत माल शहरात पाठवावा लागतो. शेतकऱ्याचा सगळा फायदा दलालच खातो.

ग्रामीण भागात आवश्यक सुधारणा पोहचू शकल्या नाहीत. कित्येक गावांत पाण्याची कायम टंचाई असते. वाहतूक व्यवस्था, दळणवळणाची साधने यांचा पूर्ण अभाव असतो. शाळा, महाविद्यलाय या शैक्षणिक सुविधा नसतात. कित्येक खेडेगावांत रुग्णालये सोडाच, पण वेळप्रसंगी डॉक्टरही उपलब्ध नसतो. शहरात आज मनोरंजनाची साधने विपुल आहेत. स्वाभाविकच तरुण पिढीला याचेच आकर्षण असते. मग ते खेड्यांतून शहरांकडे पळतात. गवे माणसांशिवाय ओस पडतात

Similar questions