ग्रामीण समुदायातील लोकांचे संबंध konate
असतात.
Answers
Answer:
ग्रामीण समाजात अशा व्यवसायांवर अवलंबून असलेल्यांची संख्या अधिक असते. ... किंवा अल्पसंख्य असणारे काही धर्मपंथांचे लोकही नगरात पुष्कळ असतात व त्यांचा संबंध इतर धर्मीयांशी या ... ग्रामीण समुदायात प्रचलित कायदा काहीही असला, तरी समुदायाला अयोग्य वाटणारे वर्तन ... त्यांच्या सुखसंवादाचे विषय कोणते, ते कोणत्या ऐच्छिक संघसंस्थांचे सदस्य आहेत इ.
Explanation:
Explanation:
स्वतंत्र रीत्या अगर सामूहिक रीत्या स्वतः कसत असलेल्या जमिनीजवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या कायम वस्तीला ग्राम असे सामान्यतः म्हटले जाते. शेती करण्याची कला किंवा तंत्र मानवाला अवगत झाले, तेव्हापासून ग्राम किंवा खेडेगाव हे अस्तित्वात आले. अन्नधान्याच्या शोधार्थ मानव भटकत होता, तेव्हा त्याला एकाच ठिकाणी कायम वस्ती करून राहणे शक्य नव्हते. म्हणून खेडेगावाचे कायम स्वरूप, हे शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांच्या अन्नधान्याच्या किमान गरजा भागवण्याइतकी उत्पादनक्षमता असलेली जमीन उपलब्ध असण्यावर अवलंबून असे. जमिनीची अशी क्षमता ही मूलतः जमिनीचा गुण आणि जमीन कसण्याकरिता उपलब्ध असलेले ज्ञान आणि अवजारे यांवर अवलंबून असते. जमीन चांगली असेल किंवा जमीन लागवडीखाली आणण्याचे तंत्रज्ञान प्रगत असेल, तेथे वस्ती मोठी असणे स्वाभाविक आहे. खेडेगाव हे मुळातच शेतजमिनीवर आधारित असल्यामुळे व स्वतः कसत असलेल्या शेताजवळ राहण्याची मानवाची सहजप्रवृत्ती असल्यामुळे, त्याच्या आकारावर साहजिकच मर्यादा पडतात. म्हणून खेडेगाव हे नगरापेक्षा किंवा शहरापेक्षा आकाराने लहान असते. खेडेगावाचे स्वरूप हे (१) भौगोलिक, प्रादेशिक किंवा परिस्थितिविज्ञानात्मक, (२) सामाजिक रूपरचनात्मक, (३) सामाजिक संस्थात्मक आणि (४) सांस्कृतिक असे चतुर्विध आहे.