India Languages, asked by ItsArmy, 2 months ago

ग्रामीण वस्ती व शहरी वस्ती फरक लिहा​

Answers

Answered by Anonymous
22

Answer:

शहरी आणि ग्रामीण जीवनपद्धती एकत्र येत एक नव्या प्रकारची भौगोलिक-सामाजिक रचना आताशा जगात दिसू लागली आहे. शहरी आणि ग्रामीण या शब्दांपासून तयार झालेला ‘रुर्बनायझेशन’ हा शब्द यासाठी उपयोगात आणला जातो. आजचा काळ एवढा झपाट्याने बदलत चालला आहे, की शहर आणि ग्रामीण असा फरक वेगाने धूसर होत चालला आहे

Answered by rajraaz85
4

Answer:

शहरी वस्ती व ग्रामीण वस्तीतील फरक खालील प्रमाणे

  1. ग्रामीण वस्ती अतिशय विरळ प्रकारची असते तर शहरी वस्तीत लोकसंख्येचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात असते.
  2. ग्रामीण वस्तीतील घरे हे एकमेकांना चिटकून असतात व ते जमिनीवर असतात तर शहरी वस्तीतील घरे हे उंच उंच इमारतीत असतात व दोन इमारतींमध्ये बरेचसे अंतर असते.
  3. ग्रामीण वस्तीतील घरे हे कच्च्या माला पासून बनलेले असतात तर शहरी भागातील घरे हे सिमेंट कॉंक्रिट वापरून बनवलेले असतात.
  4. ग्रामीण वस्तीतील घरे तेथील भौगोलिक परिस्थिती बघून बनवलेले असतात. उदाहरणार्थ कोकणातील उतरत्या छपराची घरे. तर शहरातील घरे हे जास्तीत जास्त लोकसंख्या एका ठिकाणी कशी राहील या दृष्टिकोनातून वसाहती तयार करून बनवलेले असतात.
Similar questions