२) ग्रंथालयाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा.
Answers
'ग्रंथालय' हे असे ठिकाण आहे की जेथे जगातील सर्व विषयांचे ज्ञान, ग्रंथ व ग्रंथेतर साहित्याच्या (उदाहरणार्थ, दृक्-श्राव्य साधने) रूपाने वाचक म्हणून तुम्हांला ज्ञान, माहिती, शिक्षण, संशोधन आणि • मनोरंजन अशा विविध कारणांसाठी ग्रंथपाल किंवा ग्रंथालय सेवकांकडून अगदी कमी वेळात उपलब्ध करून दिले जाते.
म्हणजेच, वाचकाने मागितलेला ग्रंथ किंवा माहिती योग्य वेळी देण्याचे काम ग्रंथपालातर्फे ग्रंथालयात केले जाते.
यावरून डॉ. शि. रा. रंगनाथन यांनी ग्रंथालयाची पुढीलप्रमाणे.
व्याख्या केली आहे.
"Library is a trinity of books, readers and
staff."
म्हणजेच 'ग्रंथ, वाचक आणि ग्रंथपाल ही त्रिमूर्ती केंद्रस्थानी असलेली संस्था किंवा ठिकाण म्हणजे ग्रंथालय होय.'
यासाठी आपण अशा प्रकारची कामे ज्या विभागात चालतात (उदाहरणार्थ, उपार्जन विभाग, ग्रंथोपस्कार (ग्रंथप्रक्रिया) विभाग, देवघेव विभाग, संदर्भ विभाग, नियतकालिक विभाग) त्या सर्व विभागांची माहिती करून घेऊ.
वाचक विविध प्रकारचे असतात (जसे, संशोधक, विद्यार्थी, कामगार, इत्यादी.). त्यांच्या वाचनसाहित्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारची ग्रंथालये अस्तित्वात आली आहेत. या प्रत्येक प्रकारच्या ग्रंथालयातील वाचनसाहित्य संग्रह व दिल्या जाणाऱ्या सेवा ग्रंथालयाच्या प्रकारानुसार बदलतात. आधुनिक काळात संगणक आणि दृक्-श्राव्य साधनांच्या प्रभावामुळे प्रत्येक ग्रंथालयाचे स्वरूप व त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सेवा यांच्यात आमूलाग्र बदल झालेला आहे.