ग्रंथपालाना काय संबोधले आहे ?
Answers
Answer:
ग्रंथालय म्हणजे ग्रंथसंग्रहाचे स्थान. ग्रंथालय ही प्राचीन सामाजिक संस्था असून तिला मोठा इतिहास आहे आणि तो मानवसंस्कृतीशी समांतर आहे. ग्रंथ, वाचक आणि ग्रंथालयातील सेवक हे ग्रंथालयाचे तीन प्रमुख घटक होत. या घटकांचे स्वरूप व त्याविषयाच्या कल्पना कालमानानुसार बदलत गेल्याचे आढळून येते. याबरोबरच ग्रंथालयाची वास्तू, ग्रंथालयीन प्रशासन, आंतरग्रंथालयीन सहकार्य व आंतरराष्ट्रीय ग्रंथालयीन संघटना इ. घटकही आधुनिक ग्रंथालयविचारात येतात. ग्रंथालयाचे प्रकार आणि कार्य यांचाही विचार या संदर्भात महत्त्वाचा असतो.
प्राचीन ग्रंथालयांत इष्टिका,पपायरस व चामडे यांवर लिहिलेले ग्रंथ असत. त्यात पुढे हस्तलिखित ग्रंथांची व नंतर मुद्रित ग्रंथांची भर पडली. आधुनिक ग्रंथालयांत ग्रंथांबरोबर नियतकालिके, कागदपत्रे, हस्तलिखिते, नकाशे, छायाचित्रे, शिल्पाकृती, शिलालेख, नाणी, तिकीटे, ध्वनिमुद्रिका, मुद्रित फीती, सूक्ष्मपट (मायक्रोफिल्म), सूक्ष्मपत्र (मायक्रोकार्ड), लेखछायाचित्रे, कात्रणे इ. प्रकारचे दृक्श्राव्य ज्ञानसाहीत्य संग्रहीत केले जाते. प्राचीन ग्रंथालयातील इष्टिका, शिला, चर्म अथवा तत्सम साधनांद्वारे तयार केलेले ग्रंथ दुर्मिळ असल्यामुळे त्यांचे रक्षण करणे एवढेच कार्य ग्रंथपालाला यापूर्वी असे परंतु आधुनिक युगात ग्रंथ सुलभ झाल्यामुळे ग्रंथपालाच्या कार्याची व्याप्ती वाढली आहे. वाचकांना ग्रंथांचा अधिकाअधिक उपयोग करू देऊन ज्ञानाचा प्रसार समाजात कसा करता येईल, वाचकांशी आपुलकीने वागून त्यांच्या जिज्ञासा व गरजा तत्परतेने कशा पुऱ्या करता येतील, जिज्ञासूंना यथायोग्य मार्गदर्शन करून ज्ञान, मनोरंजन तसेच नागरिकत्वाची व सुसंस्कृतपणाची जाणीव त्यांच्यात कशी वाढेल, त्यांचे व्यक्तिमत्त्व सुसंपन्न कसे होईल यांसाठी सदैव सिद्ध राहणारा ग्रंथपाल आजच्या ग्रंथालयाचा प्रमुख घटक मानला गेला आहे.